Home » महाराष्ट्र माझा » पत्रकारांच्या समस्या सोडवून घेणार – ना. खोतकर

पत्रकारांच्या समस्या सोडवून घेणार – ना. खोतकर

पत्रकारांच्या समस्या सोडवून घेणार – ना. खोतकर

डोंगरचा राजा / आँनलाईन

पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्न जसाच्या तश्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोडवून घेणार असल्याची ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास. मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग  राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर  यांनी दिली.

  जालना येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व भारत जनसंवाद व वृत्तपत्रविदया महाविद्यालय जालना याच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त समाज माध्यमाचा वाढता प्रभाव व वृत्तपत्राची भूमिका या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना राज्यमंत्री                    श्री खोतकर बोलत होते.

  व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून  माहिती व जनसंपर्क महासंचानालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक यशवंत भंडारे हे तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य मराठी पञकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव अरोटे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुबोधकुमार जाधव, म. रा.म. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण राऊत, दिलीप पोहनेरकर, सुभाष भालेराव,  पंडित भुतेकर, अनिल रहाणे, रवी मुंढे, पंडित बोराडे यांच्यासह पत्रकार संघाचे  पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती  होती.

 यावेळी राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, पत्रकारांची लेखणी किमया घडू शकते परंतु तिला विधायक वळण असणे गरजेचे असल्याचे सांगत पत्रकारांनी सकारात्मक पध्दतीने पत्रकारिता करण्याची गरज असल्याचेही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी बोलतांना माहिती व जनसंपर्क महासंचानालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक यशवंत भंडारे म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी समाजाचे प्रश्न, भावना, घटना पोहचविण्याचे  काम पत्रकार अविरत करत असून पत्रकारांचे व नागरिकांचे हक्क समान असून लोकशाहीमध्ये पत्रकारांना वेगळे स्थान दिलेले आहे. समाज माध्यमांचा वापर करण्यात आपला देश प्रथम क्रमांकवर आलेला असूनही वृत्तपत्राच्या भूमिकेला आजही तितकेच महत्त्व असल्याचे नमूद  करत समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरीही पत्रकारांनीही समाज माध्यमांचा वापर करताना सजगता बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन श्री. भंडारे  यांनी  आपल्या व्याख्यानातुन केले.

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे म्हणाले की, सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज असून पत्रकारांनी निर्भय पत्रकारिता करण्यासाठी शासनाने पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणण्याची गरज व्यक्त करुल  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आतापर्यंत दुर्घटनेतील १६८ पत्रकारांना मदत केली असल्याचेही त्यांनी  यावेळी  सांगितले.

  या  कार्यक्रमाला पत्रकार संजय उनगे, एल. एम. कुरेशी, रवींद्र लोखंडे, आनंद ईदानी, आशिष गारकर, बबन वाघ, सय्यद इरफान, विकास बागडी, सुहास खर्डीकर यांच्यासह  जिल्ह्यातून अनेक पत्रकाराची उपस्थिती होती.

*******

Leave a Reply

Your email address will not be published.