Home » माझी वडवणी » पौष पौर्णिमा चौंडेश्वरी मातेचा महोत्सव

पौष पौर्णिमा चौंडेश्वरी मातेचा महोत्सव

पौष पौर्णिमा चौंडेश्वरी मातेचा महोत्सव

डोंगरचा राजा / आँनलाईन

चौंड़ेश्वरी महोत्सवानिमीत्त ज्ञानेश्वरी पारायण व भव्य संगीत रामकथा सोहळ्याचे आयोजन.

वड़वणी — कोष्टी समिजा सह वड़वणीकरांचे आराध्य दैवत असलेल्या चौंड़ेश्वरी मातेचा महोत्सव पौष पौर्णिमा या दिवसी साजरा केला जातो.प्रतीवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी प्रथमच भव्य संगीत रामकथेचे आयोजन करण्यात आले असुन श्री ह.भ.प.नामदेव महाराज लबड़े,पंढरपुरकर यांच्या प्रभावी वाणीतुन होणार असल्याने या कार्यक्रमास मोठ्या संस्थेने उपस्थीत राहावे असे आव्हान कोष्टी समाज बाधंव व वड़वणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
पौष पोर्णिमा चौंड़ेश्वरी माता महोत्सवा निमीत्त दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या सह विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षी पहिल्यांदाच चौंड़ेश्वरी माता महोत्सवा निमीत्त भव्य संगीत रामकथेचे आयोजन चौंड़ेश्वरी मंगल कार्यालय,वड़वणी येथे करण्यात आले असुन या महोत्सवाचा प्रारंभ सोमवार 14 जानेवारी रोजी होत असुन सागंता सोमवार 21 जानेवारी 2019 रोजी होत आहे. या सप्ताहात रामायनाचार्य ह.भ.प.नामदेव महाराज लबड़े यांच्या वाणीतुन संगीत रामकथा रात्री 8 ते 11 या कालावधीत श्रवण करण्यास मिळणार आहे. सोमवार 14 जानेवारी रोजी ग्रंथ महात्म शिवपार्वती विवाह. 15 जानेवारी रोजी शिवपार्वती संवाद. सिता स्वयंवर. 16 जानेवारी रोजी आहिल्या उध्दार,सिता स्वयंवर. 17 जानेवारी रोजी राम वनवास. केवट कथा. 18 जानेवारी रोजी भरत भेट,सिता हरण. 19 जानेवारी रोजी शबरी भेट,वाली वध. 20 जानेवारी रोजी लंका दहन,श्रीराम राज्यभिषेक इत्यादि कथा ऐकण्यासा मिळणार आहे. तसेच दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 10 रामायणाचार्य श्री. ह.भ.प.नामदेव महाराज लबड़े यांचे काल्याचे किर्तन होईल. तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री चौंड़ेश्वरी मातेच्या पालखीची भव्य-दिव्य मिरवणूक व नंतर महाप्रसादाचे होइल.यावर्षी अन्नदान वड़वणी नगरपंचायत चे नगरसेवक श्री लक्ष्मणराव भानुदासराव आळणे यांच्या वतीने होणार आहे. तरी भाविक भक्तानी संगीत रामकथा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त कोष्टी समाज बाधंव व वड़वणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.