छेडछाड,मारहाण.दोघांची निर्दोष मुक्तता
डोंगरचा राजा / आँनलाईन..
कडीवडगाव येथील फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशन वडवणी येथे फिर्याद दिली की, तिचा दीर नामे हनुमंत बादाडे याने रात्रीच्या वेळेला ती घरात एकटी असतांना घरात घुसून छेडछाड केली व कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे फिर्यादी महिलेणे घटनेबाबत हनुमंत चा मुलगा ताराचंद यास सांगितले असता ताराचंद व हनुमंत ने लाथा बुक्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली , व सदर घटना फिर्यादी महिलेने तिचे पतीस सांगून त्या प्रकरणी पोलीस स्टेशन वडवणी येथे गु र क्र 49/2013 कलम 452, 354, 323, 504, 506 सह 34 भा द वी प्रमाणे नोंद होऊन कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले व सदर प्रकरणात फिर्यादी पक्षाच्या वतीने एकूण 5 साक्षीदार ची साक्ष नोंदवली आणि त्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये संशय निर्माण झाल्यामुळे व आरोपीचे वकील अॅड. श्रीराम लंगे यांच्या युक्तीवादामुळे आरोपींना वडवणी न्यायालयातील न्यायाधीश श्री के के चाफले साहेब यांनी दि 08 जाणे 2019 रोजी निर्दोष मुक्त केले.
आरोपीच्या वतीने अॅड. श्रीराम लंगे यांनी काम पाहिले व त्यांना अॅड.भास्कर उजगरे, अॅड. गजानन खताळ व गोविंद लंगे यांनी सहकार्य केले.