Home » माझी वडवणी » वडवणी शहर स्मार्ट सिटी करणार ना.मुंडे

वडवणी शहर स्मार्ट सिटी करणार ना.मुंडे

वडवणी शहर स्मार्ट सिटी करणार ना.मुंडे

डोंगरचा राजा / आँनलाईन

— नगरपंचायत विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यास हजारोंचा जनसमुदाय लोटला

वडवणी — दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी वडवणी तालुक्याची निर्मिती केली मात्र त्यानंतर पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या भ्रष्टवादी सरकारने वडवणी शहराच्या विकासासाठी दमडीचाही निधी दिला नाही परिणामी शहर विकासापासून कोसो दूर राहिले मात्र केंद्रात व राज्यात आपली सत्ता येताच देशात व राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे मागील चार वर्षापासून वडवणी शहराचाही झपाट्याने विकास होत आहे व तो दिसत आहे याच्या आपण साक्षीदार आहात वडवणी शहराच्या विकासासाठी मुंडे साहेबांचा रखे आपणही कधीच निधीची कमी पडू दिली नाही मागेल तेवढा शेकडो कोटी रुपयांचा निधी कसलाही विचार न करता आपण दिलेला आहे व यापुढेही कितीही नीती निधी लागो तो देणारच वडवणी शहराला महाराष्ट्रात एक स्मार्ट सिटी अशी ओळख निर्माण करून देण्याचे ध्येय आपण उराशी बाळगले आहे आणि त्या ध्येयपूर्तीसाठी आजवर जशी सात व प्रेम वडवणी करणे आम्हा मुंडे कुटुंबीयांना दिले आहे तसेच ते कायम ठेवा ही पंकजाताई नेहमीच वडवणी करांसाठी व सर्वांगीण विकासाच्या बाजूने समर्थपणे आपल्या सोबतच आहे अशी भावनिक साद अशी भावनिक साद नामदार पंकजाताई मुंडे यांनी वडवणी करांना दिली.
वडवणी नगरपंचायत च्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या नूतन व्यापारी संकुल अद्यावत स्मशान भूमी विविध फुले विविध सिमेंट रस्ते विविध अंडर ड्रेनेज यासह विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा काल शनिवार दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्राच्या रणरागिणी ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री कथा बीड जिल्ह्याच्या कर्तुत्ववान पालक मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते तसेच बीड जिल्ह्याच्या अभ्यासू खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे आमदार आर टी देशमुख आमदार सुरेश आण्णा धस जिल्हा परिषद अध्यक्ष सविताताई गोल्हार भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे माजी आमदार केशव दादा आंधळे रमेश राव आडसकर मोहनराव जगताप बाबुराव पोटभरे सहल भैया चाऊस अशोकराव जैन डॉक्टर स्वरुपसिंह हजारी डॉक्टर प्रकाश आनंदगावकर महादेवराव बडे दिनकरराव आंधळे अनिता मुंडे सुदामराव बडे मच्छिंद्र चाटे रानुबाई रेडे अर्जुन तिडके अंगद मुंडे महादेव रेडे वशिष्ठ वरवडे आसाराम महादर गुरुप्रसाद गुरसाळे ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे नगराध्यक्ष मंगल ताई मुंडे उपनगराध्यक्ष कमल पवार पवार सभापती शिवाजी टकले सभापती कचरू जाधव सभापती प्रेमदास राठोड नगरसेवक आत्माराम जमले शेषराव जगताप इस्माईल पठाण अंकुश वारे किसन राठोड संजय उजगरे विनय नहार सुधीर ढोले यासह सर्व नगरसेवक व्यापारी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रमेश राव आडसकर मोहनराव जगताप बाबुराव पोटभरे आमदार आर टी देशमुख आमदार सुरेश आण्णा धस खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पुढे बोलताना नामदार पंकजाताई मुंडे म्हणाल्या की लोकनेते मुंडे साहेबांनी दिलेल्या जादूच्या कांडीने राष्ट्रवादीचे जवळपास सगळेच येत्या काळात भाजपात आल्याचे तुम्हाला दिसणार आहे आगामी काळात राष्ट्रवादी हा केवळ दोन माणसं पुरताच पक्ष शिल्लक राहील असे काम मी करणार आहे आजवर विरोधी पक्षात असूनही बीड जिल्ह्याची जनता मोठ्या विश्वासाने व स्वाभिमानाने मुंडे साहेबांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आज तेच प्रेम आमच्यावरही कायम आहे वडवणी तालुक्याची निर्मिती निकषात बसत नसतानाही ती बसवून तालुका निर्मिती करणे ही साहेबांचे किमी होती पंचवीस वर्षात अख्या मराठवाड्यातील नगरपंचायतीला जेवढा निधी आला नाही त्यापेक्षा जास्त निधी एकट्या वडवणी नगरपंचायत ला आलेला आहे आणि त्यातूनच वडवणी शहराचा कायापालट कायापालट झाल्याचे दिसत आहे राजाभाऊ मुंडे म्हणजे राजकारणाचे पत्ते डावपेच योग्य वेळी खोलून एक घाव दोन तुकडे करणारा कोहिनूर हिरा आहे काही वेळा तर कठीण राजकीय निर्णय याप्रसंगी आम्हीसुद्धा हक्काने अण्णांचे मत घेत असतो वडवणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सतत भुकेला असणारा हा व्यक्ती म्हणजे वडवणी साठी लाभलेला विकास प्रिय नेताच होय अस्मानी संकटाने सर्वच बेजार आहेत मात्र या दुष्काळी परिस्थितीचा सामना सर्वांनी मिळून करू मी स्वतः तसेच आडसकर साहेब जगताप साहेब व आमदार देशमुख या आमच्या चारही जणांचे कारखाने वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक ठेवणार नाहीत जर राहिलाच तर वाळलेल्या उसाच्या भरपाईसाठी शासन दरबारी शेतकऱ्यांना त्याची योग्य ती भरपाई मिळवून देणार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सरकारलाही भाग पाडणार रेल्वेचे बीड जिल्हा वासियांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे रेल्वे विभागाने आतापर्यंत दोन ट्रायल घेतलेले आहेत हे काम प्रगतिपथावर असल्याचे द्योतक आहे विरोधक मात्र आजवर फक्त गप्पा मारण्यातच गेले मला फक्त विकासाची भूक आहे मराठवाड्याला आज पर्यंत लातूर व नांदेड असे दोन वेळेस मुख्यमंत्री लावले मात्र त्या दोघांनी मिळून जेवढा मराठवाड्यासाठी विकासनिधी आजवर दिला त्यापेक्षा शंभर पटीने अधिक निधी मी केवळ ग्रामविकास मंत्री असतानाही देऊ शकले ही माझ्यासाठी आणि मराठवाड्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे मागचे भ्रष्टवादी सरकार पुन्हा कधीच सत्तेवर न येण्यासाठी आम्ही सर्वांनी वज्रमूठ बांधूया आहे आपल्यासाठी साथ मिळेल याचा मला विश्वास आहे आपली ताकद शंभर पटीने वाढलेली आहे बीड लोकसभेसाठी विरोधकांना उमेदवार सापडत नाही यातच त्यांची हार आहे तर आपण तुमच्या सगळ्यांच्या 7 व आशीर्वादाने आजच लोकसभा जिंकल्यात जमा आहे मागील विश्वविक्रम आपल्या अमुल्य मतदानातून पुन्हा मोडीत काढून नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी आपण सज्ज आहोत मात्र गाफील राहू नका विरोधकांच्या गप्पांना थारा देऊ नका केवळ विकासाच्या बाजूने कौल द्या अशी भावनिक साद शेवटी नामदार पंकजाताई मुंडे यांनी वडवणी करांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते बाबरी मुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन व शेवटी सर्व उपस्थितांचे आभार ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published.