बेदरे यांना मराठवाडा स्तरीय पुरस्कार जाहीर
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्यामराठवाडा स्तरिय पत्रकारिता पुरस्कार २०१८ सालाचे पुरस्कार ५ जानेवारी रोजी संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले असुन या मध्ये पाटोदा येथील दैनिक पुढारीचे महेश बेदरे यांना शोध वार्ता गटात विभागीय स्तराचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पाटोदा (जि.बीड ) येथील दैनिक पुढारी चे महेश बेदरे यांनी लिहीलेल्या ‘आई मुकबधिर तर वडीलांचे कायमचे आजारपण ‘ या बातमीस कै. नागनाथराव बिरादार यांच्या स्मरणार्थ हा विभागीय स्तरीय शोध पुरस्कार जाहीर करण्यात आला असुन लवकरच उदगीर येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.परिक्षक म्हणून प्रा. डाॅ. राजकुमार मस्के,प्रा.डाॅ. दत्ताहरी होनराव व प्रा. प्रविण जाहुरे यांनी काम पाहिले. हा पुरस्कार मिळाल्याबददल महेश बेदरे यांचे आ. सुरेश अण्णा धस यांच्या सह तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमीनाथ कोल्हे, पत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विजय जोशी जेष्ठ पत्रकार छगन मूळे सर्व पत्रकार , मित्रपरीवार यांनी अभिनंदन केले आहे .