गोवर्धन जाधव यांचे निधन ..
डोंगरचा राजा / ऑनलाईन
— अंत्यविधी उद्या सकाळी 10 वाजता
पाटोदा येथील गोवर्धन निवृत्ती जाधव यांचे आजारपनाने आज 1 जानेवारी रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास अहमदनगर ईथे रुग्णालयात निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 72 वर्ष होते .अंत्यविधी 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मांजरसुबा रोड जानपीर परिसर येथे होणार आहे. गोवर्धन जाधव आबा हे पाटोदाच्या राजकारणात सक्रीय असत त्यांनी ग्रा. प.सदस्य , सेवा सहकारी संस्था चेअरमन , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती इत्यादी पदे भूषविली त्यांच्या पश्चात पत्नी ,चार मुले, मुली ,सुना ,नांतवडें असा मोठा परिवार असून ,माजी आमदार कै लक्ष्मणराव तात्या जाधव यांचे ते पुतणे होते