विकास व संरक्षणासाठी शिवसेना कटीबद्ध – मुळूक
डोंगरचा राजा / आँनलाईन..
— माजलगाव मतदार संघाच्या विकास व संरक्षणासाठी शिवसेना कटीबद्ध – सचिन मुळूक
— चिंचोटी येथे विकास कामांचा भव्य शुंभारंभ संपन्न.
वडवणी — गोड-गोड बोलून जनतेचा विकास होत नसतो त्यासाठी व्हिजन आवश्यक असतं,जनतेच्या हितासाठी धडपड करावी लागते.लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजुन घ्यावे लागतात हिच वर्ती फक्त शिवसैनिकाच्या रक्तात असुन जनतेचा विकास व संरक्षण करणं हे शिवसेनेचं अद्य कर्तव्य आहे.असं मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी व्यक्त केलं आहे.
शिवसेनेचे राज्यमंञी आ.दादाजी भुसे यांच्या सहकार्याने आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या प्रयत्नातुन वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे सिंमेट रस्त्याच्या कामासाठी पाच लाखाचा निधी मंजुर करुन घेतला असुन यांचा आज सकाळी अकरा वाजता मुळूक यांच्या हस्ते भव्य शुंभारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना जिल्हा संघटक रामदास ढगे,सहसंघटक योगेश नवले ,वडवणी तालुकाप्रमुख संदिप माने,युवासेनेचे शहर प्रमुख हनुमंत शिंदे,शिवाजी सावंत,प्रतापजी मात्रे,जालिंदर चिनके,शेख समीर यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.तर पुढे बोलताना सचिन मुळूक म्हणाले कि,आज पर्यत शिवसेनेची नाळ हि जनतेशी राहिलेली आहे.ती पुढे हि कायम राहिल.जनतेची विकास कामे करणे हेच शिवसेनेचे अद्य कर्तव्य असुन त्यासाठी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा सच्चा विचारांचा शिवसेनिक मावळा अहोराञ जनतेच्या हितासाठी रस्त्यावर आहे.असे यावेळी म्हणाले तर चिंचोटी ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच प्रयागबाई पंडित,उपसरपंच माऊली गोंडे,सदस्य शिवाजी गोंडे, दत्तात्रय गोंडे,केशव गोंडे,दत्ता गोंडे,अशोक गोंडे, तुकाराम राठोड,संजीवनी पाचणकर,संजय गोंडे, पांडुरंग गोंडे,मुन्ना गोंडे,अनुरूथ गोंडे,गणपत गोंडे,संदिपान गोंडे,मोहन बादाडे,सुभाष बादाडे, बद्रीनाथ उबाळे,यासह आदि नागरिक उपस्थित होते.