Home » महाराष्ट्र माझा » धनगर युवकांनो पेटून उठा- पडळकर

धनगर युवकांनो पेटून उठा- पडळकर

धनगर युवकांनो पेटून उठा- पडळकर

सखाराम बोबडे / डोंगरचा राजा आँनलाईन..

— आजोबा पंणजोबाच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी धनगर युवकांनो पेटून उठा- पडळकर

आज पर्यंत प्रस्थापित राज व्यवस्थेने आपल्या आजोबा पंणजोबा अपमानच केला. या अपमानाचा बदला घेण्यासाठी धनगर समाजातील प्रत्येक युवकाने पेटून उठण्याचे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले.ते खंडोबा मंदिराच्या परिसरात (चिटमोगरा ता बिलोली ) मंगळवारी आयोजित हजारो जनसमुदायासमोर ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुडे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. उत्तमराव जानकर, प्रा. डॉ. यशपाल भिंगे परळीचे भीमरावजी सातपुते, शिवदास बिडकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना गोपीचंद पडळकर मन्हाले की प्रस्थापित व्यवस्थेचे आपल्या आजोबा पंजोबा पासून यांच्या व आपल्या कुटुंबाचा अपमानचच केला. त्यांचा फक्त वापर करून घेण्यात आला. आपल्या कुटुंबप्रमुखाचा झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी धनगर समाजातील प्रत्येक युवकाने पेटून उठण्याची गरज आहे. शिक्षण व राजकारणात प्रत्येकाने प्रगती करत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. धनगर समाजाच्या लोकांनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी खडोबाची शपथ त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. आपल्या मतदारसंघात धनगर समाजाचा आमदार निवडून देऊन आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यावा असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील 91 मतदारसंघात धनगर समाजाची ताकत दखल घेण्याजोगी आहे. या मतदारसंघात धनगर समाज ठरवेल तोच आमदार होणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सध्याच्या सरकारने प्रत्येक धनगर समाजाच्या युवकांच्या हातात एसटीचे प्रमाणपत्र नाही दिले तर या सरकारला खाली खेचणयाचे आवाहनही त्यांनी केले. बिलोली तालुक्यासह नांदेड जिल्ह्याच्या सर्वच भागातील समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात असलेली महिलांची लक्षणीय संख्या पाहता यांनी महिलांना नतमस्तक होत अभिवादन करत उपस्थितांची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published.