Home » महाराष्ट्र माझा » यशोधरा बुध्दविहारात मार्गशीर्ष पौर्णिमा..

यशोधरा बुध्दविहारात मार्गशीर्ष पौर्णिमा..

यशोधरा बुध्दविहारात मार्गशीर्ष पौर्णिमा..

माजलगांव / रविकांत उघडे

— नालागिरी मदमस्त हत्तीसमान विमनस्क अवस्थेला शांत करा–धम्ममित्र शिनगारे

आज काही तथागत गौतम बुद्ध किंवा बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे परत आपल्यात येऊ शकत नाहीत.पण त्यांच्या शिकवणुकिचे अर्थात बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण करुन सद्या समाज व व्यकिगत मनात थैमान घालणारी नालागिरी मदमस्त हत्तीसमान विमनस्क अवस्थेला शांत करण्याचे प्रतिपादन धम्ममित्र एन.जि.शिनगारे यांनी दि.२२ रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या कार्यक्रमात यशोधरा बुद्धविहार येथे बोलत होते.
त्रिरत्न बौद्ध महासंघ व यशोधरा बुद्धविहार विश्वस्तमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मागशीरो पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे अायोजन दि.२२ रोजी सायंकाळी करण्यात आले होते.मार्गशीर्ष पौर्णिमेचे बौद्ध संस्कृतीमधिल महत्व सांगताना ते म्हणाले कि, दानविर राजा बिंबिसाराची भेट आणि देवदत्ताच्या इर्षेपोटी घडलेले परिणाम हे आपल्याला आपले उच्चतम शरणगमण स्थान निश्चित करण्यासाठी खुप उपयुक्त ठरतात.म्हणुन स्वविकास व सामाजिक विकासासाठी,बौद्ध म्हणुन जगण्यासाठी आपल्या आचरणातील संदिग्धतेचे वैरभावाचे,चित्तमलाचे नालागीरी हत्तीसमान मदमस्त विमनस्क विचार अवस्थेला शांत करणे नितांत गरजेचे अाहे.
यावेळी बि.धम्मसेन बोधी भंते यांनीही उपस्थितांना धम्मदेसना दिलि. धम्मजीवनाची त्रेसष्ट वयवर्ष गाठलेल्या भारतीय बौध्द बांधवांनी अधिक जबाबदारीने धम्ममार्गाचे अनुसरण करावयास हवे. जास्तितजास्त नागरिकांनी बुद्ध विहारात जाऊन आष्थशीलाचे पालन केले पाहिजे.परदेशातुन पुन्हा भारतात बौद्ध धम्म आणल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सततपणे पुण्यानुमोदन करणे आणि जयभीम च्या व्यापक अर्थाचे महत्व देखिल जपले पाहिजे. असे भंतेजिने धम्मदेसनेत महत्व सांगितले.यावेळी पदमिनबाई कांबळे यांनी बुद्धगीत व जि.एन.घनघाव यांनी भीम गीत सादर केले.कु.कौशांबी भालेराव या बालिकेने पंचशील पालनाची नितिकथा सादर केली.तर बाबासाहेब जाधव यांनी सुत्रसंचालन केले.यावेळी शहरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.