Home » माझी वडवणी » मुलीला नांदवत नसल्याने पित्याची आत्महत्या

मुलीला नांदवत नसल्याने पित्याची आत्महत्या

मुलीला नांदवत नसल्याने पित्याची आत्महत्या

डोंगरचा राजा / आँनलाईन

— डिवाय एसपी भास्कर सावंत यांनी दिली भेट

— कुप्पा येथील घटना.

— सहा जणांवर गुन्हा दाखल.

वडवणी तालुक्यातील मौजे कुप्पा येथील राजाअंबर रामभाऊ सावंत वय 60 वर्षे हे शेतकरी असुन यांच्या मुलीचा दोन वर्षांपूर्वी बाहेगव्हाण येथील मुलांशी मोठ्या थाटामाटात लग्न विधी पार पडला. माञ अवघ्या तीन महिण्यात मुलीला सासरच्या मंडळींनी नांदविण्यास नकार दिल्याने पित्याने रविवार रोजी दिनांक 23/12/2018 सकाळी 9-30 च्या दरम्यान स्वतः च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुप्पा येथील राजाअंबर रामभाऊ सावंत यांना एक मुलगा व तीन मुली आहेत. त्यापैकी तीन नंबर ची मुलगी हिचा बाहेगव्हाण येथील वचिष्ट जाधव यांच्या मोठ्या मुलासोबत दि 24 डिसेंबर 2016 रोजी मोठ्या थाटामाटात लग्न विधी पार पडला. माञ अवघ्या तीन महिण्यात मुलीला सासरच्या मंडळींनी ञास देऊन माहेरी पाठवून नांदवण्यास नकार दिला. या प्रकारामुळे वधु पिता राजाअंबर हे सतत नैराश्याचे जिवन जगत होते. लग्नानंतर अवघ्या तीन महिण्यानंतर मुलीच्या संसाराचे वाटोळे पाहू न शकल्याने वधू पिता राजाअंबर रामभाऊ सावंत यांनी स्वतः च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती वडवणी पोलीसांना मिळताच घटनास्थळी जावून प्रेत खाली घेतले व शवविच्छेदन साठी कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दिपक राजाअंबर सावंत यांच्या फिर्यादीवरून मुलीचा पती, सासरा, सासू, दिर, नंनद या सहा जणांवर कलम 306 / 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खिशात चिठ्ठी!
मयत राजाअंबर रामभाऊ सावंत यांनी मरणापूर्वी खिशात स्वतः च्या मुलीचा सासरा वचिष्ट जाधव यांच्या नावची चिठ्ठी लिहून ठेवली ही चिठ्ठी वरून नातेवाईकांंनी आधी आत्महत्यास जबाबदार असणा-यांवर गुन्हा दाखल करा अन्यथा प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे वडवणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला .

सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे, पीएसआय अंधारे ,एएसाय उबाळे, शिंदे पोलीस नाईक राठोड, पोलीस शिपाई वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मयताच्या खिशातील लिहून ठेवलेली चिठ्ठी हस्तगत करून सविस्तर पंचनामा केला. पुढील तपास डिवाय एसपी भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व सपोनी सुरेश खाडे यांच्या आदेशानुसार पिएस आय सिद्दिकी हे करत आहेत.

* पोलीस उपविभागीय अधिकारी भास्कर सावंत यांनी वडवणी ठाण्यात भेट देवून घटनेची माहिती घेत तातडीने या प्रकरणातील आरोपी यांना अटक करण्यासाठी सपोनि सुरेश खाडे यांच्या सह पोलीसांना सुचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.