Home » ब्रेकिंग न्यूज » बस-मोटार सायकल अपघात दोन ठार..

बस-मोटार सायकल अपघात दोन ठार..

बस-मोटार सायकल अपघात दोन ठार..

माजलगांव/रविकांत उघडे

बस मोटारसायकलचा अपघातात जालना जिल्ह्यातील पति-पत्नी जागिच ठार.

माजलगांव, दि.२४(प्रतिनिधि) तालुक्यातील राजेगांव येथे गेवराईहुन माजलगांवकडे येणाऱ्या बस क्र.एमएच २० बी.एल.१७५९ ने जोराची धडक दिल्याने मोटारसायकल क्र. एमएच २१ बी. के.६०२१ वरील भोसले पति-पत्नी हे जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना दि.२३ रविवार रोजी सायंकाळी चार वाजनेच्या सुमारास घडली आहे. याबाबत माहिती मिळालेली अशी की,घनसावंगी जी.जालना तालुक्यातील गुंजमुर्ती येथील भाऊराव भोसले, वय २७ वर्ष व पत्नी नंदा भोसले वय २४ वर्ष हे माजलगावहुन वरिल नमुद मोटारसायकलने गावाकडे राजेगांव मार्गे जात असतांना राजेगांव येथील वळण रस्त्यावर गेवराईहून माजलगांवकडे येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने या पती – पत्नीचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी चार वाजनेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत अाहे.दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन पुढील कार्यवाहीस्तव ग्रामीण रुग्णांलयात पाठविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.