Home » माझी वडवणी » उद्या वडवणीत काँग्रेसची बैठक – मस्के

उद्या वडवणीत काँग्रेसची बैठक – मस्के

उद्या वडवणीत काँग्रेसची बैठक – मस्के

डोंगरचा राजा / आँनलाईन

वडवणी – आगामी निवडणुकीत देशात व महाराष्ट्रात काँग्रेसची निर्वीवाद सत्ता स्थापन करण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील कार्येकर्त्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेळावे व बैठकीचे आयोजन करण्यात येत असून या अनुषंगाने सोमवार दिनांक २४ रोजी वडवणीत नगरपंचायत बचत गट भवन येथे काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होत आहे. तरी यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे युवा नेते पांडुरंग मस्के यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नुकत्याच देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पाचही राज्यात काँग्रेसने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. पैकी तीन राज्यात तर बहूमताने सत्ता स्थापन केली आहे. संपूर्ण देशात आता काँग्रेसची लाट उसळली असून या विक्रमी विजयाचा अवघ्या देशात विजयोत्सव साजरा केला गेला आहे. आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी केवळ काही महिने बाकी राहिले आहेत. आगामी निवडणुकीत देशात व महाराष्ट्रात काँग्रेसची निर्वीवाद सत्ता स्थापन करण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील कार्येकर्त्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेळावे व बैठकीचे आयोजन करण्यात येत असून या अनुषंगाने वडवणी काँग्रेस कमिटी यांच्या वतीने वडवणी येथे येत्या दि.२४/१२/२०१८ सोमवार रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत बचत गट भवन येथे बीड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला हिंगोली जिल्हा काँग्रेस प्रभारी दादासाहेब मुंडे, वडवणी तालुका अध्यक्ष रामेश्वर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव आंधळे, तानाजी माळी, युवक तालुका अध्यक्ष सतीष मस्के, सतीश मुजमुले, बाबासाहेब झोडगे, विष्णू उजगरे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन वडवणी काँग्रेस कमिटी व युवा नेते पांडुरंग मस्के यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.