Home » ब्रेकिंग न्यूज » न्यायाधिश प्राची कुलकर्णी यांच्या हस्ते इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिक.

न्यायाधिश प्राची कुलकर्णी यांच्या हस्ते इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिक.

न्यायाधिश प्राची कुलकर्णी यांच्या हस्ते इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिक.

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड दि.20 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठीच्या निवडणूकीत वापरण्यात येणारे नविन M-3 प्रकारच्या मतदार यंत्राच्या (इव्हीएम व व्हीव्हीपॅट) च्या सहायाने जिल्हा सत्र न्यायाधीश मा.श्रीमती.प्राची कुलकर्णी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या सभागृहामध्ये प्रमुख उपस्थितीत प्रात्याक्षिकाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना मा.श्रीमती.प्राची कुलकर्णी म्हणाल्या की, काळानुसार नवनवीन क्षेत्रात क्रांती होत आहे तसेच नवीन इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनेही आता मतदानाच्या क्षेत्रात ही मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. देश प्रगती पथावर जाण्याचे हे एक माध्यम आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधीकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.एम. डी. सिंह (IAS)यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन वापराबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मशीन वापराबाबत विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे दिली. तसेच या मशिनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मतदान केले त्याची प्रत्यक्ष चिठ्ठी सात सेकंदासाठी पाहता येणार आहे. त्यानंतर ही चिठ्ठी सदरील मशीनच्या बॉक्स मध्ये संकलित होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्री.चद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा प्रमुख न्यायाधीश-1 श्री.बी.व्ही. वाघ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी श्री.महेंद्रकुमार कांबळे, समाज कल्यान विभागाचे सहायक आयुक्त श्री. मडावी, जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश उपस्थित होते.
इव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे मतदान जनजागृती व प्रशिक्षण संदर्भात दि. 20 डिसेंबर 2018 पासून जिल्हयातील 06 मतदार संघातील तालुकानिहाय प्रत्येकी दोन पथकाच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी महाविद्यालय, बसस्थानक, आठवडी बाजार, मतदार केंद्रावर प्रात्याक्षिका द्वारे मतदारामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.प्रविणकुमार धरमकर यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान करुन घेऊन प्रत्येकी उमेदवाराला किती मतदारांचे मतदान पडले तसेच त्याचे मशीन व व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठीद्वारे पडलेले मतदानाची मोजनी करुन दाखवली. तसेच निरक्षर,दिव्यांग,वृध्द व इतर सर्वानांच या मशिनद्वारे मतदान सोपे आहे काही अडचण येणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा न्यायालयातील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. *-*-*-*-*-*-*

Leave a Reply

Your email address will not be published.