Home » माझा बीड जिल्हा » ईव्हीएम मशिन,व्हीव्हीपॅटची जनजागृती

ईव्हीएम मशिन,व्हीव्हीपॅटची जनजागृती

ईव्हीएम मशिन,व्हीव्हीपॅटची जनजागृती

डोंगरचा राजा / आँनलाईन

आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठी च्या निवडणूकीत वापरण्यांत येणारे नविन M-3 प्रकारच्या मतदान यंत्राच्या (ईव्हीएम व व्हीव्हीपॅट) सहाय्याने जिल्हाभरात जनजागृती मोहिम राबविण्याबाबत मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून युध्दपातळीवर तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी श्री. एम. डी. सिंह व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री प्रविणकुमार धरमकर यांनी दिनांक 11.12.2018 व 13.12.2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व मतदान नोंदणी व सहायक मतदान नोंदणी अधिकारी/कर्मचारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधींची बैठक व पत्रकार परिषद घेतली. तसेच जिल्हयातील जनजागृती मोहिमेसाठी सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना दिनांक 18.12.2018 व 19.12.2018 रोजी मा. आयोगाच्या सूचनेनूसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे करण्यांत येणा-या जनजागृती बाबत प्रशिक्षण दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री एम. डी. सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत, लोकसभा मतदार संघातील सर्वच मतदान केंद्रावर व्हिव्हिपॅट मशीन चा वापर करण्यांत येणार असल्याबाबत सांगितले. या मशिनच्या माध्यमातून आपण ज्या उमेदवाराला मतदार केले, त्याची प्रत्यक्ष चिठठी 7 सेंकदासाठी पाहता येणार आहे. त्यानंतर ही चिठठी सदरील मशीनच्या बॉक्समध्ये संकलित होणार आहे.
तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे मतदान जनजागृती व प्रशिक्षणा संदर्भात दिनांक 20.12.2018 पासून जिल्हयातील 06 विधानसभा मतदार संघातील तालुकानिहाय प्रत्येकी 02 पथकाच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी जसे, महाविद्यालय, बसस्थानक, आठवडी बाजार, मतदान केंद्रावर आदी ठिकाणी जनजागृती करण्यात येणार असून यावेळी प्रातक्षिकही करुन दाखविले जाणार आहे. तसेच सदर प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या मोहिमेचे व्हिडीओ चित्रण देखील करणेबाबत मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बीड यांनी सूचना दिल्या.
सदर प्रशिक्षणास जिल्हयातील सर्व मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सर्व सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, निवडणूक नायब तहसिलदार, नियुक्त् मास्टर ट्रेनर, निवडणूक विषयक कर्मचारी इत्यादी अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.