Home » महाराष्ट्र माझा » श्री नाथ क्लिनिकमध्ये ३१३ रुग्णांना लाभ

श्री नाथ क्लिनिकमध्ये ३१३ रुग्णांना लाभ

श्री नाथ क्लिनिकमध्ये ३१३ रुग्णांना लाभ.

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

— स्वं.गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त भव्य होमिओपॅथिक शिबीरास उत्फुर्स प्रतीसाद

स्वं.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे डॉ रविंद्र मुंडे (श्री नाथ क्लिनिक) व बाबरी मुंडे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य होमिओपॅथिक मोफत तपासणी व सर्व रोग निदान शिबीर दिनांक 10 डिसेंबर 2018 वार सोमवार रोजी बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार मा. डॉ. प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब , आमदार आर टी देशमुख , माजी आमदार केशवराव आंधळे, युवा नेते बाबरी मुंडे, राम सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला.या शिबीरासाठी खास करून रूग्णांची सेवा करण्यासाठी डॉ. शार्दुल जोशी सर ( पुणे ), डॉ.प्रशांत सांगडे ( जळगाव ) , डॉ. नरेंद्र पायघन ( अहमदनगर ) व डॉ. रविंद्र मुंडे ( वडवणी ) डॉ.भागवत ( वडवणी ) यांनी विशेष योगदान दिले.वडवणी परीसरातील 313 रुग्णांनी या भव्य होमिओपॅथिक शिबीराचा लाभ घेतला.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी , बालाजी चाटे, ॲड. शाम थोटे, ॲड. श्रीकांत मुंडे, अमोल शिंदे , अशोक मुंडे, बाळु मुंडे, उत्तरेश्वर तडसकर , श्री किसन मुंडे, गणेश कळसकर, सुधीर मुंडे, अरुण मुंडे, नवनाथ मुंडे, नवनाथ वाव्हळ, बप्पा घाडगे, विनोद गोंडे, विकास मुंडे, धनराज मुंडे, वैजनाथ घाटुळे, या सर्वांनी आपले मोलाचे योगदान भव्य होमिओपॅथिक शिबीरास दिले.वडवणी परीसरातील सर्व रूग्णांनी शिबीराचे आयोजकांना व डॉ. रविंद्र मुंडे यांच्या श्री नाथ क्लिनिक यांना रुग्णांची अशीच सेवा करण्यासाठी भरपूर शुभ आशिर्वाद दिले

Leave a Reply

Your email address will not be published.