देवदहिफळमध्ये पहेलवानांची तुफान दंगल.
डोंगरचा राजा / ऑनलाईन
सालाबादप्रमाणे देवदहिफळ यात्रेत पहेलवानांची तुफान दंगल पहातांना कुस्ती शोकिनांनी मैदान नाचवले.
धारुर तालुक्यातील देवदहिफळ ची यात्रा काल दि १३ रोजी श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या लग्नाने सुरु झाली. अनादी काळापासून चालत असलेल्या देवदहिफळच्या यात्रेचे मुख्य आकर्षण येथे संपन्न होणाऱ्या कुस्ती स्पर्धा होय. बीड व आसपास च्या जिल्ह्यातुन जवळपास ५०० मल्ल येथे कुस्ती खेळतात. ५ रुपयांपासून ६००१ रुपयांची बक्षीस येथे संयोजन समितीच्या वतीने देण्यात येतात.
आज दि.१४ रोजी माजलगाव सह साखर कारखाना उपाध्यक्ष मोहन जगताप, युवा नेते रोहित देशमुख, महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, दिंद्रुड कृषक स.सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्रीहरी बडे, माजी जि प सदस्य विलास बडे, नरहरी बडे यांच्यासह प्रमुख उपस्थितीत भव्य कुस्तीची दंगल संपन्न झाली.
सरपंच श्रीधर बडे, युवा नेते दिलीप बडे, राज बडे, सुग्रीव बडे, तुकाराम राख, नामदेव जाधवसह दहिफळ येथिल तरुणांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. दिंद्रुड पोलीस स्टेशन ते सपोनि सचिन पुंडगे व सहा.पो. उपनिरीक्षक बुध्देवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी योग्य बंदोबस्त लावल्याने कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. दहा ते पंधरा कुस्ती शौकिनांनी कुस्तीचे मैदान दणाणून सोडले होते.