Home » माझी वडवणी » गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

डोंगरचा राजा / ऑनलाईन

वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा चिंचवण याठिकाणी सध्या कार्यरत असलेले उपक्रमशील आदर्श शिक्षक रविंद्र गायकवाड सर यांना आष्टी येथील साने गुरूजी प्रतिष्ठानचा यंदाचा राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

सन २०१६ व सन २०१७ मध्ये दोन वेळा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आष्टी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले, ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात सोन्याच्या दोन अंगठ्या व सपत्निक भरपेहराव करून सन्मानित केलेले, स्व.आबासाहेब (दादा) आंधळे प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले, चौंडेश्वरी युवक प्रतिष्ठान वडवणीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, स्व.वसंतरावजी नाईक आदर्श शिक्षक पुरस्कार, भारतदादा जगताप मिञमंडळ आदर्श शिक्षक पुरस्कार, वडवणी रोटरी क्लब बीड आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी असंख्य पुरस्कार मिळवणारे केंद्रिय प्राथमिक शाळा चिंचवण ता.वडवणी शाळेत कार्यरत असणारे विद्यार्थीप्रिय व समाजप्रिय शिक्षक तथा उपक्रमशील शिक्षक रविंद्र गायकवाड सरांना यंदाचा सन २०१८ चा आष्टी येथील साने गुरूजी प्रतिष्ठानचा राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून विविध मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण दिनांक २३ डिसेंबर २०१८ रोजी जोगेश्वरी मंगल कार्यालय आष्टी येथे करण्यात येणार आहे. तरी याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.