Home » महाराष्ट्र माझा » खा.प्रितम मुंडे यांची नवोदय विद्यालयास भेट

खा.प्रितम मुंडे यांची नवोदय विद्यालयास भेट

खा.प्रितम मुंडे यांची नवोदय विद्यालयास भेट

डोंगरचा राजा / ऑनलाईन

— शुध्द पिण्याचे पाणी व सौर उर्जेसाठी निधी देण्याचे आश्वासन

— नवोदय विद्यालयास भेट देवून मने जिंकणाऱ्या प्रितमताई पहिल्या खासदार

बीड जिल्ह्याच्या अभ्यासू तथा कर्तव्यदक्ष खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी नुकतीच जवाहर नवोदय विद्यालय गढी याठिकाणी पालकांच्या आग्रहाखातर भेट देऊन तेथील पालक, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांशी हितगुज साधला. व्यवस्थापनाची सर्व माहिती घेऊन विद्यालयाच्या गरजांचा आढावा घेतला. यावेळी विद्यालयासाठी आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी तसेच सौर ऊर्जासाठी आपल्या खासदार निधीतून निधी देण्याचे आश्वासन यावेळी खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी दिले. दरम्यान नवोदय विद्यालयास भेट देवून मने जिंकणाऱ्या प्रितमताई जिल्ह्यातील पहिल्या खासदार ठरल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या अभ्यास तथा कर्तव्यदक्ष खासदार डॉ.प्रितमताई मुंडे ह्या शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यामध्ये खूप आग्रेसर आहेत. विद्यार्थ्यांप्रती त्यांची असलेली आपुलकी व जिव्हाळा तसेच शैक्षणिक कार्याप्रती असलेली त्यांची जागरूकता पुन्हा एकदा पाहावयास मिळाली. जवाहर नवोदय विद्यालय गढी या ठिकाणी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेट द्यावी अशी इच्छा काही पालकांनी त्यांच्याकडे व गेवराईचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्यापाशी व्यक्त केली. पालकांच्या या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देऊन खासदार डॉ.प्रितमताई मुंडे व आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांसह इतर मान्यवरांनी नुकतीच जवाहर नवोदय विद्यालय गढी या ठिकाणी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी हितगुज साधले तसेच पालक व शिक्षक वृंद यांच्याशीही संवाद साधून विद्यालयीन व्यवस्थापन व अध्ययन-अध्यापन याचा आढावा घेत काही गरजा असतील तर ते तात्काळ सोडवू असे सांगितले. यावर तेथील काही पालकांनी विद्यालयासाठी व तेथील मुलींच्या वस्तीगृहासाठी शुद्ध पिण्याचे पाणी व सौर ऊर्जा यासाठी आपल्या खासदार फंडातून निधी देण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने खासदार प्रितमताई मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांची ही मागणी तात्काळ मान्य करीत लवकरच आपण जवाहर नवोदय विद्यालय गढी या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी व सौर ऊर्जा यासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान नवोदय विद्यालयास भेट देवून मने जिंकणाऱ्या प्रितमताई या जिल्ह्यातील पहिल्या खासदार ठरल्या आहेत. त्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंद निर्मिती झाल्याचे पाहावयास मिळाले.
यावेळी खा.डॉ.प्रितमताई मुंडे व आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्या सोबत समाज कल्याण सभापती संतोष हंगे, गेवराई भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, ज्येष्ठ नेते राजेंद्र बांगर, विनोद सौंदरमल, जि.प.सदस्य प्रल्हाद माने, वडवणी बाजार समिती सभापती दिनकरराव आंधळे, पालक बाळासाहेब घुगे वडवणी, बंडू बारगजे गेवराई यासह इतर पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.