Home » माझी वडवणी » भगवा झंझावात निर्माण करा- अॅड विचारे

भगवा झंझावात निर्माण करा- अॅड विचारे

भगवा झंझावात निर्माण करा- अॅड विचारे

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

— बुथप्रमुखांच्या मेळाव्याने शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण करा..

वडवणी — आगामी काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना स्वबळावर लढण्याचे आता स्पष्ट झाले असुन, शिवसेना प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार माजलगाव विधानसभा संपर्कप्रमुख अॅड. सुनिल विचारे यांनी वडवणी तालुक्यात बुथ प्रमुखांच्या बैठका सुरु केल्या आहेत. त्यांच्या समवेत बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळूक , बीड जिल्हा समन्वयक भाई संजय महाद्वार, जिल्हा संघटक रामदास ढगे , सहसंघटक योगेश नवले , उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके माजलगाव तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव , वडवणी तालुका प्रमुख संदीप माने , वडवणी शहर प्रमुख नागेश डिगे , तालुका समन्वय बाबासाहेब चाटे ,भारतराव मस्के पाटील युवा सेनेचे तालुकाप्रमुख मारुती मुंडे, युवा सेनेचे शहरप्रमुख हनुमंत शिंदे , यांनी वडवणी येथिल सुमित फंक्शन हॉलला बैठकीचा शुभारंभ केला.

वडवणी तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून काही काळाने मरगळ आलेल्या या तालुक्याला जागे करण्यासाठी आम्ही गाव, वाडी, वस्तीवर शाखा स्थापना करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळूक यांनी या बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले. तळागाळात शिवसेना पोंचवत शिवसेनेचे ध्येय धोरण जनमानसात रुजवणे अवश्यक असुन, शिवसेनेची थंडावलेली तोफ डागण्याची काम शिवसेनेचे नविन पदाधिकारी करणार तसेच झोपलेला वाघ जागा करायचे असल्याचे वक्तव्य रामदास ढगे यांनी या बैठकीत व्यक्त केले.

जास्तीत जास्त शिवसैनिक जोडणे आवश्यक असुन, शिवसेनेचे ,तालुकाप्रमुख संदीप माने व नागेश डिगे यांनी वडवणी तालुक्यात वेळोवेळ बैठकीचे आयोजन करावे, कार्यकर्त्यांच्या समस्या जाणुन त्यावर तोडगा काढावा येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या सुचना माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख प्रमुख सुनिल विचारे यांनी शिवसेना बुथप्रमुखांना केल्या. बैठकीस वडवणी तालुक्यातील विष्णू टकले , संजय जोशी , संदिपान शिंदे , रामप्रसाद चव्हाण , राधाकिसन शिंदे , बालासाहेब बादाडे , किशोर सावंत आशोक आजबे रवी निपटे , दिपक सावंत , दत्ता सावंत , आत्माराम सावंत , दत्ता राऊत , शिवाजी सावंत , बबलु आजबे , मोहन महाराज , मधु वाडरे , सर्जेराव शेडगे ़मुढे , मुकुंद बरबडे , कृष्णा कोळपे , चद्रकांत जाधव , आबा कोळपे , प्रदीप मोरे , राज पाटील , असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.