Home » माझा बीड जिल्हा » आ.देशमुखांनी दिला मदतीचा हात.

आ.देशमुखांनी दिला मदतीचा हात.

आ.देशमुखांनी दिला मदतीचा हात.

डोंगरचा राजा / ऑनलाईन

असं म्हणतात राजकारणात काम करणाऱ्या पुढाऱ्यांना मन नसतं.सत्तेच्या सुखात रमलेले पुढारी आणि त्यांच्यातली संवेदनशीलता याबाबत बरीच चर्चा समाजात होते. मात्र माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आर.टी.देशमुख यांनी काल जालना येथे जाताना स्कुटरवरुन अपघातग्रस्त ठिकाणी पडलेल्या मुलीच्या बाबत घेतलेली भुमिका उपस्थितांनी पाहिली तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले. घाबरलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या मुलीला दिलेला धीर हा खऱ्या अर्थाने संकटात बळ देणारा ठरला.
झाले असे की, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.आर.टी.देशमुख हे गुरूवारी भोकरदन जि.जालना येथे पक्षाने आयोजित केलेल्या बैठकीसाठी जात होते. अंबड ते जालना रस्त्यावर प्रवास करत असताना समोरून स्कुटरवर येणारी मुलगी रस्त्याचे काम चालु असल्याने घसरून पडली. आमदाराच्या हे लक्षात येताच त्यांनी आपली गाडी थांबवली.स्वत: स्कुटरखाली अडकलेल्या मुलीला अगोदर बाहेर काढले. या अपघातात मुलीच्या डोक्याला मार लागला होता.मात्र तो जास्त नाही हे आमदारांच्या लक्षात येताच त्यांनी चिखलमातीने भरलेले हात स्वत: धुतले. तिच्या गुडघ्याला आणि पायाला मार लागला होता. सदर मुलगी अपघातामुळे प्रचंड घाबरली होती. त्यांनी तब्बल पंधरा मिनिटं या ठिकाणी थांबुन तिची आस्थेवाईक चौकशी केली. अवघ्या तीन कि.मी.अंतरावर तिचे गांव होते. अपघातातुन बालंबाल बचावलेली मुलगी मात्र नंतर पुर्णपणे सावध झाल्यावरच त्यांनी त्याच गाडीवर मुलीला सावकाश बसुन दिले. तिच्या डोक्याला मार लागल्याने थोडासा रक्तस्त्राव झाला. कितीही रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्यांनी मदत केली. अपघातस्थळी काही वेळातच ये-जा करणाऱ्याची गर्दी वाढली. बऱ्याचदा रस्त्यावर अपघात झाला.नंतर आपल्यावर काही कुभांड येवु नये म्हणुन प्रवाशी सरळ निघुन जातात.मात्र आमदारांनी घेतलेली भुमिका आणि त्या मुलीला केलेली मदत ही खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीच्या मनातली संवेदनशीलता उपस्थितांना भावली. सुरूवातीला आमदारांची ओळख पटली नाही.मात्र काही लोकांनी गाडी पाहिली तेव्हा एक आमदार अशी भुमिका घेवु शकतो याचे कौतुक अनेकांनी केले.स्वत:च्या लेकरावानी त्या मुलीबाबत घेतलेली भुमिका पाहिल्यानंतर उपस्थित वयोवृद्धांच्या डोळ्यात अश्रु पाणावले. सदर मुलगी स्कुटीवर पुन्हा व्यवस्थित गेल्यानंतरच आमदार तेथुन निघुन गेले.सांगायचं तात्पर्य हे आहे की, पुढाऱ्यांच्या मनात अशा प्रकारची संवेदनशीलता राहिल्यानंतर संकटात लोकांना कशी मदत होवु शकते याचे हे उदाहरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.