Home » माझी वडवणी » भव्य रक्तदान शिबिरास उपस्थित रहा – आंधळे

भव्य रक्तदान शिबिरास उपस्थित रहा – आंधळे

भव्य रक्तदान शिबिरास उपस्थित रहा – आंधळे
डोंगरचा राजा / आँनलाईन
– स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वडवणीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
वडवणी — सामाजिक दृष्टीकोनातून रक्तदानांची गरज सर्वञ अंत्यत निर्माण झाली आहे. देशात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला प्राण गमववा लागला आहे. म्हणुन कोणत्याही व्यक्तींचा जिव वाचावायला हवा म्हणुन या सामाजिक जानवेतुन रक्तदान करायलाच हवे. गेल्यावर्षी स्व.मुंडे यांच्या जयंतीनिमीत्त वडवणीत रेकॉर्डब्रेक रक्तदान झाले होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा  शहरात लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त 10 डिसेंबर सोमवार रोजी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीराचे सलग 8 वे वर्ष असुन रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाचे उद्घघाटण खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. केशवराव आंधळे, आमदार आर. टी देशमुख, रमेशराव आडसकर, राजाभाऊ मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात येणार आहे. या भव्य शिबिरात मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते सरपंच संजय आंधळे यांनी केले आहे.
       याबाबत अधिक माहीती अशी की,
वडवणी शहरात केंद्रीय ग्रामविकासमंञी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर घेतले जाते. ही परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त दि.10 डिसेंबर सोमवार रोजी सकाळी 10 वाजता भाजपा कार्यलय वडवणी येथे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते सरपंच संजय आंधळे यांनी गती वर्षी प्रमाणेच याही वर्षी भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या रक्तदान शिबीराचे सलग 8 वे वर्ष असुन  शिबिराचे उद्घाटन खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते तर विद्यमान आमदार आर.टी.देशमुख, माजी आमदार केशवराव आंधळे, राजाभाऊ मुंडे,दिनकर आंधळे, पंजाबराव मस्के,राम सावंत, रोहीत देशमुख,मच्छिंद्र झाटे, बन्सी मुंडे, प्रदीप शेळके, अनंत शेळके, बाबरी मुंडे, राजेभाऊ मस्के, महादेव बडे, महादेव रेडे, अर्जुन तिडके, शिवाजी मुंडे यांच्यासह भाजपाचे सर्व युवा नेते सर्व नगरसेवक, सर्व सरपंच, ग्रा.पं. सदस्य, सर्व चेअरमनसह आदिंच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रम होत आहे. स्व.मुंडेंच्या जयंती निमत्ताने वडवणी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे. तालुकास्तरावरील या भव्य रक्तदान शिबिरास व विविध कार्यक्रमास युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते सरपंच संजय आंधळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.