Home » माझा बीड जिल्हा » बचत गटांना शेळ्या वाटप -ॲड कवठेकर

बचत गटांना शेळ्या वाटप -ॲड कवठेकर

बचत गटांना शेळ्या वाटप -ॲड कवठेकर

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

— तेजस बँकेकडून रमाई महिला बचत गटाला आधार..

यावर्षी दुष्काळीस्थिती असल्याने हाताला काम देण्याची गरज निर्माण झालेली आहे. यामुळे डोंगरकिन्ही गटातील १०० महिला बचत गटांना तेजस बँकेच्या माध्यमातून शेळ्या देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन ॲड.प्रकाश कवठेकर यांनी केले. ते पिंपळगाव धस येथे रमाई महिला बचत गटाच्या शेळ्या वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

पिंपळगाव धस (ता.पाटोदा) येथे शुक्रवारी रमाई महिला बचत गटातील सभासद महिलांना प्रति दोन शेळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ॲड.कवठेकर बोलत होते. यावेळी सरपंच बापुराव राजपुरे, गटाच्या अध्यक्षा राहिणी कांबळे, संजय कचरे, बबन गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ॲड.कवठेकर म्हणाले, डोंगरकिन्ही जिल्हापरिषद गटात भयान दुष्काळीस्थिती आहे. अशा काळात येथील लोकांच्या हाताला काम देणे अपेक्षीत असल्याने आपण तेजस बँकेच्या माध्यमातून शेळ्या वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शेळीपालनातून एक घर सक्षमपणे उभा राहू शकते, ज्यांना शेळ्या दिल्या आहेत, असा विश्वास असून याठिकाणी डोंगरभाग असल्याने बचत गटांनी शेळीपालनाकडे वळावे, असे अवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी रमाई बचत गटाच्या सचिव नंदा बनसोडे, शोभाबई कांबळे, सारिका कांबळे, रत्नाबाई सोनवणे, अलका ससाणे, आसराबाई सोनवणे, कल्पना तुरूंकमारे, आशाबाई बनसोडे, चंद्रकला कांबळे, सुमन महानोर, उपसरपंच बबन रांहिज, सचिन राहिंज, कैलास गुजर, आण्णा महानोर, बबन गुजर, संजय कचरे, रामकीसन साबळे, अंकुश महानोर, सखाराम गुजर, शिवाजी गुजर, शबाना शेख आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.