Home » देश-विदेश » लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार

लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार

लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होणार

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकी सोबत महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सत्ता सोडल्यास लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा या दोन्ही निवडणूक एकत्र घेतल्या जाऊ शकतात अशी माहिती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक वेळेस लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचे सूतोवाच केले होते. मात्र विरोधक एकत्र निवडणुकीला विरोध करत आहेत. त्यामुळे किमान भाजपाची ज्या राज्यात सत्ता आहे. त्या ठिकाणी एकत्र निवडणूक घेण्याचे मोदींचे स्वप्न साकार होऊ शकते याची सुरुवात महाराष्ट्रापासून होऊ शकते कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच महाराष्ट्र सरकारचा कार्यकाल संपत आहे अशा वेळी एकत्र निवडणूक घेण्यासाठी राज्य विधानसभा पाच सहा महिने अगोदर विसर्जित करावी लागेल. या नंतर एकत्र निवडणुकीचा प्रयोग केला जाऊ शकतो.अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांमध्ये एकत्र निवडणुका होऊ शकतात. यामध्ये आंध्र प्रदेश,ओरिसा, सिक्कीम ,अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. आंध्रप्रदेश ,ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांची मुदत जून 2019 पर्यंत संपत आहे. तसेच जम्मू कश्मीर विधानसभा विसर्जित केल्यानंतर येथे सहा महिन्याच्या आत मध्ये निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. तसेच महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा सहा महिने अगोदर विसर्जित कराव्या लागणार आहेत. तेव्हाच्या सात राज्यात लोकसभा निवडणुका होऊ शकणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.