Home » माझी वडवणी » डेंग्यूच्या आजाराने आयशाचा मृत्यू

डेंग्यूच्या आजाराने आयशाचा मृत्यू

डेंग्यूच्या आजाराने आयशाचा मृत्यू

डोंगरचा राजा / ऑनलाईन

वडवणी शहरातील रहिवाशी असलेल्या अलीम कुरेशी यांच्या दिड वर्षाच्या कु.आयशा हिचा डेंग्यूच्या गंभीर आजाराने मृत्यू झाल्याने कुरेशी परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.डाॅक्टरांच्या चुकीच्या निदानामुळे एका लहान बाळाला आपला जीव गमावावा लागला आहे.अत्यंत शोकाकुल वातावरणात आयशाला अखेरचा निरोप देण्यात आला.

वडवणी शहरातील प्रभाग ८ आणि ९ मधील रहिवाशी असलेल्या ८ ते १० नागरिकांना डेंग्यूच्या आजाराने त्रस्त केले आहे.हे रुग्ण बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरातीलच रहिवाशी असलेल्या अलीम कुरेशी यांच्या दिड वर्षाच्या कु.आयशा या मुलीला सुध्दा डेंग्यूच्या आजाराने त्रस्त केले.तिच्यावर उपचार करण्यासाठी गत दोन दिवसांपुर्वी बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र तेथील डाॅक्टरांनी वेळीच उपचार न केल्याने कु.आयशा हिची पृकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने या मुलीवर उपचार करण्यासाठी औरंगाबादला हलवले गेले तेथे उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात दफणविधी करण्यात आले. आजही येथील प्रभागातील नागरिकांना डेंग्यूच्या आजाराने त्रस्त व्हावे लागते आहे. नगरपंचायत ने याची गंभीर दखल घेऊन आरोग्य विभागाला कळवुन उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे. कुरेशी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.