Home » माझा बीड जिल्हा » बीड मध्ये पाटील यांनी घेतली कार्यशाळा

बीड मध्ये पाटील यांनी घेतली कार्यशाळा

बीड मध्ये पाटील यांनी घेतली कार्यशाळा

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

— अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची
कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न

बीड, दि. 3:- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कार्यशाळा नरेंद्र पाटील अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती संतोष हंगे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. चव्हाण उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसिलदार, सर्व बँकेचे शाखाधिकारी उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी या महामंडळाची उद्देश सांगितले तसेच महामंडळाच्या कर्ज प्रकरणाबाबत त्यांनी बँकनिहाय आढावा घेवून प्रलंबित प्रकरणे तात्काळ मंजूर करण्याबाबतच्या सूचना सर्व बँक शाखाधिकाऱ्यांना दिल्या.
सुरुवातीला जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे वैयक्तिक कर्ज परतावा, प्रकल्प कर्ज व्याज परतावा व गट प्रकल्प कर्जाबाबत मार्गदर्शन केले तसेच या योजनेच्या अटी व शर्ती, व्याज दर याबाबतही मार्गदर्शन केले. तसेच बॅकनिहाय कर्ज प्रस्ताव किती प्राप्त झाले. किती कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले, याबाबतचा बँकनिहाय आढावा घेवून प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्याबाबत बँक शाखाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सुचना दिल्या.
यावेळी आमदार विनायक मेटे यांनीही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळच्या कामकाजाविषयी माहिती घेवून या महांडळाकडे प्राप्त झालेल्या कर्ज प्रकरणांना तात्काळ मंजूरी देण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
यावेळी जिल्हयातील सर्व बँकेचे शाखाधिकारी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.