Home » महाराष्ट्र माझा » डीवायएसपी नवटकेंना बढतर्फ करा – पोटभरे

डीवायएसपी नवटकेंना बढतर्फ करा – पोटभरे

डीवायएसपी नवटकेंना बढतर्फ करा – पोटभरे

रविकांत उघडे / डोंगरचा राजा ऑनलाईन..

सोमवार पर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास जिल्हा सत्र न्यायालयात केस दाखल करणार ; पत्रकार परिषदेत माहिती..

माजलगाव–भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतांना जी शपथ घेतली जाते त्याच्यात जात,धर्म,भाषा,परिवार, लिंग कधीच येवू देणार नाही परंतु माजलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी ती प्रतिज्ञा तोडून कायद्याचा गैरवापर करुन तोडण्याचे कृत्य केले असल्याचा विडिओ रेकॉर्डिंगद्वारे उघड झाले असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम महिला आयपीएस अधिकार्यांनी करणे ही खेदाची बाब असून या विरोधात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याची माहिती बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी दि.30 शुक्रवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.

पुढे बोलतांना पोटभरे म्हणाले की,उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके ह्या विडिओ मध्ये बोलतांना स्पष्ट म्हणतात की,मी दलित तरुणांना हात, पाय अन् तोंड दाबून एवढे मारलेत त्याचं कारण म्हणजे अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधित कायदा मला यांच्या विरोधात खुप चीड आहे.ते खोटे गुन्हे नोंद करण्यासाठी भाग पाडतात.केंडे पिंम्प्री दलित-सवर्ण वादात प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधित कायद्या अन्वये गुन्हा दाखल झाला तेंव्हा कलम 307 प्रमाणे तक्रार मी स्वतः बसून दलितांवर दाखल केली. असे खुद्द बोलतात म्हणजे दलितांवर असलेली चीड उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके या व्यक्त करतात तर माजलगाव मधील दलित पुढाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करीन अशा धमक्या त्या देत आहेत. त्या कायद्याचा दुरुपयोग करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.यामुळे या जातीयवादी महिला अधिकार्यांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधित कायद्याखाली गुन्हा दाखल करावा अन् सेवेतून बढतर्फ करावे अशी मागणी बोलतांना केली असून जर सोमवार पर्यंत गुन्हा दाखल न केल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके विरोधात जात विरोधी वक्तव्य केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात केस दाखल करणार असल्याचे बोलतांना सांगितले.सदर तक्रारीची प्रत महामहिम राष्ट्रपती,राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग,मुख्यमंत्री,पालकमंत्री,विरोधी पक्षनेते यांना पाठवली आहे.यावेळी पत्रकार परिषदेत श्रीहरी मोरे, सचिन डोंगरे,विजय पौळ,रूपचंद कांबळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

चौकट
———————–
नवटके म्हणजे कायदा नाही हे लोकशाही व संविधानाचे राज्य आहे.

मारहाण करणे,वाळूच्या ट्रक पकडणे अशा किरकोळ कारवाई करुन चमकोगिरी करुन वाहवा मिळवीत आहेत तर अंगरक्षक वाळू ठेकेदाराकडून हप्ते घेतात. तालुक्यात मटका,दारु,पत्त्याचे क्लब हे अवैध धंदे सुरु असून हे बंद का केले नाही.केवळ दलित तरुणांवर खोट्या केसेस दाखल करीत असून भाग्यश्री नवटके म्हणजे कायदा नाही हे लोकशाही व संविधानाचे राज्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.