Home » माझा बीड जिल्हा » वैष्णवी बैंगलोरचे मैदान जिंकणार..

वैष्णवी बैंगलोरचे मैदान जिंकणार..

वैष्णवी बैंगलोरचे मैदान जिंकणार..

रविकांत उघडे / डोंगरचा राजा ऑनलाईन..

दशनाम गोसावी समाजाची कन्या वैष्णवी बन हिची महाराष्ट्र खो खो संघात निवड

वैष्णवी बन बैंगलोरचे मैदान जिंकणार

माजलगाव ( प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील पिपंळनेर येथील जि.प.माध्यमिक शाळेची विधार्थीनी वैष्णवी गणेश बन हिची बैंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो खो संघात निवड झाली आहे .
ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेऊन वैष्णवी बन हिने जिद्दीने चिकाटीने मेहनत घेऊन खेळ खेळण्यासाठी खेळाची आवड निर्माण करून नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत उंतूग भरारी घेऊन खेळी करुन सर्वाचे लक्ष वेधले होते तीच्या या खेळाची दखल घेऊन तिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली असून तिच्या या यशा बद्दल तिचे ग्रामीण भागातुन जिल्हा स्तरावर कौतुक केले जात आहे तिला खेळण्यासाठी प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवटे आणि भागवत ठोकरे या मेहनती शिक्षकांमुळे वैष्णवी बन ही महाराष्ट्र संघातून बैंगलोरच्या मैदानावर होणाऱ्या खो खो स्पर्धेत मैदान गाजवणार आहे त्यामुळे शिवसंग्राम चे नेते विनायक मेटे यांनी पिंपळनेर येथे जाऊन वैष्णवी बन सत्कार केला व महाराष्ट्रातून दशनाम गोसावी समाजाच्या नेत्यानी ही कौतुक करून पुढील कार्यास सुभेच्छा आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.