Home » महाराष्ट्र माझा » हक्कासाठी एकत्र येणे गरजेचे..

हक्कासाठी एकत्र येणे गरजेचे..

हक्कासाठी एकत्र येणे गरजेचे

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

*22 जानेवारीला मुंबईत विधानभवनावर धरणे आंदोलन*

*ब्राम्हण जात नसून तो एक विकासाचा विचार आहे*_*ह.भ.प. भरतबुवा रामदासी*_

केज (प्रतिनिधी) – *ब्राह्मण ही जात नसून तो एक विचार आहे.* *तो विचार आहे -* *मांगल्याचा, पावित्र्याचा, समतेचा, एकात्मतेचा, राष्ट्राच्या एक संघतेचा.* *आज याच विचाराचा विसर पडला आहे. हा विचार अंगिकृत करण्यासाठी इतिहासाचे अवलोकन करावे लागेल.* *इतिहासाचा विसर पडल्यामुळे हा समाज खचत आहे. काही समाज बांधव अकारण या* *समाजाची सतत टीका करतात. राजकिय लोकांना तर टीका केल्याशिवाय प्रसिद्धीच मिळत नाही. टीकेकडे लक्ष देऊ नका,* असे प्रतिपादन *_ह.भ.प. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी_* यांनी *केज येथील सकल ब्राह्मण समाज दीपावली स्नेह मीलन* कार्यक्रमात व्यक्त केले.

केज येथील श्रीराम मंगल कार्यालयात केज येथील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने स्नेहमीलन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला *राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी,* ब्राह्मण महिला विकास मंचच्या अध्यक्षा विजयाताई कुलकर्णी, पेशवा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक रणनवरे, परशुराम सेवा संघाचे आनंद कुलकर्णी, नगरसेवक विजय जोशी, दत्ता महाजन, दिगंबराव जोशी, विनायक रत्नपारखी, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, व्यापारी संघाचे अनंतराव मिटकरी, मेजर दिनकर विडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संयोजक धनंजय कुलकर्णी यांनी हा स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये ब्राम्हण समाजातील विविध समस्या, ग्रामीण भागातील समाजासमोरील समस्या आणि बीड येथील मोटार सायकल रॅली आदी बरोबरच देशाच्या विकासामध्ये समाजाचे योगदान यावर चर्चा झाली. तसेच २२ जानेवारी रोजी मुंबई येथे विधान भवनावर ब्राह्मण समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. या आंदोलनात ब्राह्मण साजाला संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात यावे, ब्राह्मण समाजासाठी वसतिगृह उभारावे, व्यवसायासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे व त्यासाठी ५०० कोटी रु. ची तरतूद करावी, समाजाची बदनामी करणाऱ्यावर ॲट्रोसिटीसारखा कायदा करुन ब्राह्मण समाजाची बदनामी करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, पौरोहित्य करणाऱ्यांना सरकारी मानधन आणि नोकऱ्यांत आरक्षण देण्यात यावे, कुळात गेलेल्या जमिनी ब्राह्मण समाजाला परत देण्यात याव्यात, या प्रमुख मागण्या व या बाबत विचार विनिमय करण्यात आला.
या स्नेहमिलन कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आणि लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातील समाजबांधव व भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक धनंजय कुलकर्णी यांचे सोबत श्रीराम शेटे, श्रीनिवास केजकर, सतीश केजकर, राहुल औसेकर, शिवराज मुथळे, अभिजित शेटे, चंद्रकांत पाटील, कृष्णा महाजन कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.