Home » माझा बीड जिल्हा » शॉर्ट सर्किटने ६ एकर उस जळाला

शॉर्ट सर्किटने ६ एकर उस जळाला

शॉर्ट सर्किटने ६ एकर उस जळाला

रविकांत उघडे / डोंगरचा राजा ऑनलाईन

माजलगाव दि 23 तालुक्यातील सावरगाव येथे एकाच कुटुंबातील तिघाजणांचा शॉर्ट सर्किटने सहा एकर ऊस जळून खाक झाला आहे.यात ड्रीप पाईप सह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे असे अंदाजे लाखोचे नुकसान झाले आहे.

सावरगाव येथील सत्यप्रेम नागोराव जगताप,चंद्रकांत नागोराव जगताप, गणेश नागोराव जगताप हे तिघे भावंडे एकजुटीने शेती करतात.यावर्षी त्यांनी शेतात उसाची लागवड केली होती. ऊस गाळप होण्याकरिता तयार होता. याच शेतातून विद्युत मुख्य वाहिनी जाते . वाऱ्याच्या झटक्याने या तारा मोठं मोठ्याने हेलकावे खात होत्या पण याकडे विद्युत महावितरणच्या अभियंत्यांनी लक्ष घातले नाही आणि त्याचा फटका मंगवारी शेतकऱ्याला बसला.ती तार मंगळवारी दुपारी अचानक तूटली आणि एकमेकाला घर्षण होऊन पेट घेतला. घर्षणाचे लोळगे उसाच्या फडात पडल्याने उसाने सर्वत्र पेट घेतला यामधे पहात पहाता सर्वत्र आगीने उग्र रूप धारण करून सर्व उस जळून खाक केला.

ऊस जोमाने यावे या करिता सहा एकरात ड्रीप अथरले होते या साठी मोठा खर्च केला होता.मात्र शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सहा एकरातील ड्रीप जळून खाक झाले आहे. यामुळे हे भावंडे हतबल झाले असून आर्थिक मदत मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे

शॉर्ट सर्किटने ऊस जळल्याची घटना समजताच तलाठी, मंडलाधिकरी, यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आणि शासन दरबारी अनुदानसाठी प्रस्ताव पुढे वर्ग केला.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मोहनराव जगताप यांनी ताबडतोब दखल घेऊन जळलेला ऊस गाळपा साठी कारखान्याकडे आणला आहे. यामुळे शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.