Home » महाराष्ट्र माझा » हॅलो बाबरी मुंडे बोलतोय..!

हॅलो बाबरी मुंडे बोलतोय..!

हॅलो बाबरी मुंडे बोलतोय..!

डोंगरचा राजा ऑनलाईन

बाबरीशेठ मुंडे वडवणीच नाहीतर पूर्ण माजलगाव मतदार संघासहीत बीड जिल्हाभरातील सर्वांच्याच परिचयाचे असलेले हे नाव. वडवणी सारख्या ग्रामीण भागात वाढणारे, कायम लोकांच्या गराड्यात राहणारे, युवकांच्या ह्रदयात स्वत:चे स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांच्या सुख दु:खाची जाण असणारे, विकास काय असतो हे कागदावर न राबवता वडील राजाभाऊ अण्णाच्या मार्गदर्शनाखाली वडवणी शहराच्या,तालुक्याच्या विकासासाठी जनतेच्या हितासाठी विविध विकास कामे करत आहेत. जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेणारे युवक नेतृत्व म्हणजे माजलगाव मतदारसंघाचे युवा नेते मा. बाबरीशेठ मुंडे होय! आज २३ नोव्हेंबर त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन!
बाबरीसेठ मुंडे यांचा जन्म वडील राजाभाऊ अण्णा व आई मंगलाताई मुंडे यांच्या पोटी 23 नोव्हेंबर 1990 रोजी वडवणी येथे झाला. वडवणी तालुक्यामध्ये बाबरीसेठ मुंडे हे नाव समोर आल्यानंतर एक नव्हे, दोन नव्हे तर हजारो युवकांची फौज उभा राहते. लहानपणा पासुनच समाजसेवेचे व्रत त्यांनी अंगिकारले आहे. वडवणी तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीत बाबरीशेठ मुंडे हे नाव ऐकायला मिळतेच. अल्प कालावधीमध्ये राजकारणात स्वतःचे एक वेगळे अस्तित्व त्यांनी निर्माण केले आहे. ते स्वतः हा निवडणुकीच्या आखाड्यात मध्ये असो वा नसो, पक्षासाठी, ताईसाहेबांसाठी स्वतः कार्यकर्त्यासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करतात.
सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारा सर्वांना आपला हक्काचा नेता म्हणून जे नाव पुढे येते म्हणजे बाबरीशेठ होय. स्व. मुंडे साहेबांकडून सामाजिक व राजकीय वसा घेत आज बाबरीशेठजी माजलगाव विधानसभा मतदार संघात जनतेच्या सदैव सेवेत आहेत. कितीही संकटे आली तरी बाबरी सेठ मुंडे आपली साथ सोडणार नाहीत हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे. आपला नेता आपल्या सोबत आहे आपण एकटे नाहीत हा विश्वास माझ्यासारख्या तमाम कार्यकर्त्यांना आहे. मोठ्या कुटुंबांमध्ये जन्मलेल्या या युवा नेतृत्वाला कधीच अहंकाराचा वारा लागला नाही. कार्यकर्त्यांच्या गराड्यात मध्ये राहणारा हा नेता सर्वांनाच आपल्या घरचा सदस्य वाटतो. नगरपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये काम करताना त्यांच्यामार्फत जी कामे झाली ती खरंच दर्जेदार आहेत. राजकारण करताना समाजकारणाची सांगड त्यांनी घातली आहे.
त्यांच्या कामाची पद्धत व त्यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनतेचा, कार्यकर्त्यांचा संपर्क पाहिल्यानंतर माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांची व जनतेची एकच इच्छा आहे की बाबरीशेठ आमदार व्हावेत. आपल्या वाढदिवसानिमित्त ते रक्तदान शिबिराचे आयोजन करतात तसेच शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, रुग्णांना फळ वाटप व गरजूंना कपडे वाटप असे उपक्रम दरवर्षी राबवतात.
विकास कामाच्या प्रश्नासाठी, गावच्या अडचणीसाठी, कोणत्याही कामासाठी कोणीही त्यांच्याकडे आल्यानंतर कसलाही दुजाभाव न करता डायरेक्ट प्रश्न मार्गी लावून देतात. सर्वसामान्य जनतेचे जर काम नियमात असेल आणि अधिकाऱ्याकडून अडवणूक होत असेल तर अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला धारेवर धरत प्रश्न मार्गी लावण्याची कला बाबरीशेठ मुंडे यांच्याकडे आहे.सेठजी बाहेर गावी गेले असले तरी फोनवर सुध्दा कामे करतात. हॅलो बाबरी मुंडे बोलतोय! एवढा एकच शब्द सर्वसामान्य जनतेला, कार्यकर्त्यांना आधार देतो तर, भल्या-भल्यांना दरारून घाम फोडतो. आमदार खासदार नसतानाही तोच दरारा ती ताकद व प्रश्न सोडवण्याची धमक सर्वसामान्यांना आधार वाटतो. आत्ता कुठेही जा ज्या त्या ठिकाणी त्यांचीच चर्चा चालू असते. आपल्या घरी, तांडा, वाडी-वस्ती गावामध्ये शेटजी येणार म्हटले की त्यांना पाहण्यासाठी लहान-थोर, महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते सर्वजण आतुरतेने त्यांची वाट बघत असतात.
राजाभाऊ अण्णांनी आपलं नाणं खणखणीत बनवण्यासाठी या सोन्याच्या शिक्क्याला अग्निपरीक्षेला सामोरे जाऊ दिलं, तसे मार्गदर्शन व शिकवण दिली. त्याच मार्गदर्शनातून उदयाला आलेलं चोवीस कॅरेट सारखं खणखणीत युवा नेतृत्व म्हणजे बाबरीशेठ मुंडे होय. त्यांनी कमी कालावधीमध्ये प्रत्येक गावागावात वाडी-वस्तीवर तरुणांची एक फौज निर्माण केली आहे. प्रत्येकांच्या अडचणीत धावून येणारा नेता, जीवाला जीव देणारा, सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम करणारा एकमेव नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यापुढेही बाबरीशेठ मुंडे यांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय सेवा घडो आणि ते आमदार व्हावेत तसेच त्यांना शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची शक्ती देऊ अशी आई तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करतो.
मा.बाबरीशेठजी आपल्या यशाची कमान अशीच उंचावत राहो.राजकारणाच्या क्षितीजावर आपला तेजोमय सुर्य तळपत राहो ही तमाम जनतेची ईच्छा पूर्ण होवो, आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो.
*हम आपको जन्मदिन पर देते है यहँ दुआ,*
*हम और तुम मिलकर, होंगे कभी ना जुदा,*
*जीवन भर साथ देंगे अपना है ये वादा,*
*तुम पर अपनी जान भी देंगे,हमारा है यहँ इरादा !!!*
– रवि लांडे वडवणी
मो.8007320753

Leave a Reply

Your email address will not be published.