सौ.प्रमिला माळी यांची निवड.
डोंगरचा राजा/ ऑनलाईन
येथील शिवसेनेच्या नेत्या सौ. प्रमिला माळी यांची शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.या निवडीने वडवणी तालुक्यातील नेतृत्वाला चांगली संधी मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सौ.प्रमिला माळी या प्रारंभापासून शिवसेनेत सक्रिय आहेत.वडवणी तालुका महिला प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक प्रश्नावर आवाज उठवला व निराधार, परितक्त्या महिलांचे प्रश्न सोडवले. पक्षसंघटन वाढवण्यावर भर दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकतीच त्यांची शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.