Home » माझा बीड जिल्हा » वाढदिवस बाबरीचा अन् महायज्ञ रक्तदानाचा

वाढदिवस बाबरीचा अन् महायज्ञ रक्तदानाचा

वाढदिवस बाबरीचा अन् महायज्ञ रक्तदानाचा

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

गतवर्षीपेक्षा जास्त रक्तदानातून नवा विक्रम करण्याचा तरुणाईचा संकल्प.

वडवणी तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान युवा नेते बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२२ नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी सकाळी १० ते ५ वा.यावेळेत वडवणी येथील नूतन व्यापारी संकुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उदात्त भावनेतून महा रक्तदान शिबिराच्या महायज्ञाचे आयोजन हे करण्यात आले असून यावेळी उद्घाटक म्हणून लोकप्रिय आमदार आर.टी. जिजा देशमुख तर अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महारक्तदान शिबिरामध्ये गतवर्षीचा ३०० रक्तदानाचा विक्रम मोडीत काढून यावर्षी त्यापेक्षाही जास्त रक्तदान करून नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प तालुक्यातील तरुणाईने केला आहे. तरी या महारक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून व रक्तदानातून आपले योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन बाबरी मुंडे मित्र मंडळ वडवणी तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्याचे अभ्यासू दमदार व उभरते युवा नेतृत्व ज्यांच्या एका हाकेला तालुक्यातील हजारो तरुणाईची फौज एका सेकंदात ओ देऊन एकत्रित येते अशी ओळख स्वकर्तत्वावर निर्माण करणारे युवा नेते बाबरी मुंडे यांच्या संघटन कौशल्याचे आज जिल्हा भरच नव्हे तर महाराष्ट्रभर चर्चा आहे. अत्यंत कमी वयात मोठे राजकीय वलय व यश प्राप्त केल्याने राजकारणातील भल्या भल्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. बाबरी मुंडे यांनी हे यश आपला मनमिळावू स्वभाव व अडचणीतील व्यक्तीच्या मग तो विरोधकही असो त्यांच्याप्रती मदतीसाठी कायम दाखवलेली तत्परता यामुळेच मिळू शकलेले आहे. कायम युवकांच्या गराड्यात असलेला हा युवा नेता चांगलाच लोकप्रिय आहे. युवकांच्या ताकदीचा, संघटन शक्तीचा व बुद्धी चातुर्याचा विधायक कामांसाठी व जनसेवेसाठी उपयोग करून बाबरी मुंडे यांनी वडवणी तालुक्याच्या इतिहासात एक नवा पायंडा पाडला आहे. वडवणी नगरपंचायत नगराध्यक्षपद, जिल्हा परिषद सदस्यपद व बीड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालकपद यासह इतर लोकप्रतिनिधींची पदे स्वतःच्या कुटुंबात असल्याकारणाने वडवणी शहर तसेच वडवणी व धारूर तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक ती विकास कामे मंजूर करून घेत ती सचोटीने राबविली आहेत. परिणामी बाबरी मुंडे यांच्या नेतृत्वाची क्रेझ कायमच वडवणी तालुक्यातील तरुणाईच्या डोक्यात असल्याचे दिसून येते. दरवर्षीच बाबरी मुंडे यांचा वाढदिवस म्हणजे युवकांसाठी आगळावेगळा सोहळा असतो व तो त्या पद्धतीने साजरा केलाही जातो. मात्र यंदा संपूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळाच्या भयावह अशा परिस्थितीने सर्वजण होरपळून निघत आहेत. परिणामी या दुष्काळी परिस्थितीचे भान राखत व सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उदात्त भावनेतून बाबरी मुंडे यांचा यावर्षीचा वाढदिवस रक्तदाना सारख्या सामाजिक उपक्रमातूनच साजरा करण्याचा निर्धार व संकल्प स्वतः बाबरी मुंडे व मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला त्या अनुषंगाने वाढदिवसानिमित्त कोणीही व कुठेही अभिष्टचिंतन सोहळा, कार्यक्रम, हार तुरे, फटाकेबाजी इत्यादी फाजील खर्च न करता केवळ रक्तदानातूनच सर्वांनी आपले बहुमूल्य असे रक्तदानाचे योगदान देऊन हा वाढदिवस साजरा करावा.
आज दि.२२ नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी सकाळी १० ते ५ वा. यावेळेत वडवणी येथील नूतन व्यापारी संकुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उदात्त भावनेतून या महारक्तदान शिबिराच्या महायज्ञाचे आयोजन हे करण्यात आले असून यावेळी उदघाटक म्हणून लोकप्रिय आमदार आर.टी. जिजा देशमुख तर अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महारक्तदान शिबिरामध्ये गतवर्षीचा ३०० रक्तदानाचा विक्रम मोडीत काढून यावर्षी त्यापेक्षाही जास्त रक्तदान करून नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प तालुक्यातील तरुणाईने केला आहे. तरी या महारक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून व रक्तदानातून आपले योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन बाबरी मुंडे मित्र मंडळ वडवणी तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.