मा.सरपंच संदिपानराव पवार यांचे निधन
डोंगरचा राजा / आँनलाईन
पुसरा गावचे भूमिपुत्र तथा गावचे माजी सरपंच संदिपानराव नामदेवराव पवार वय 65 वर्ष यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
वडवणी तालुक्यातील पुसरा या गावचे रहिवासी संदिपानराव पवार यांचा तालुका भरात मोठा संपर्क.. त्यांच्या स्वभावातच गोरगरिबांना मदत करणे हे प्रथम प्राधान्य असे. त्यांच्या या स्वभावामुळे गावासह तालुका भरात त्यांना आप्पा म्हणून ओळखत असत. शांत ,संयमी ,स्वभाव असणारे आप्पा यांनी गेली पंधरा वर्षे पुसरा या गावचे सरपंच पद भूषविले. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक शासकीय योजना राबवुन, गोरगरिबांना शासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ते गेले चार महिन्यापासून किडनी आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर बीड,पुणे,मुंबई, हैदराबाद सह आदी ठिकाणी उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने साथ मिळत नव्हती शेवटी त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचारादरम्यान दिनांक २१/११/२०१८ सायंकाळी ४:३० वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात चुलते,चुलती, तीन भाऊ, पत्नी , दोन मुले , दोन मुली , नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पुसरा येथील स्मशानभूमीत संध्याकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे.