Home » ब्रेकिंग न्यूज » प्रचलित नियमानुसार अनुदान द्या.

प्रचलित नियमानुसार अनुदान द्या.

प्रचलित नियमानुसार अनुदान द्या.

डोंगरचा राजा/ ऑनलाईन..

— मागणी करणा-या शिक्षकांनी केले मुंडन आंदोलन.

राज्यातील विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे 100 टक्के अनुदान द्यावे यासह विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदान सुरू असलेल्या शिक्षकांचे आंदोलन चांगलेच पेटले.’अभी नहीं तो कभी नहीं’ असे म्हणत,’जो पर्यंत शासन शंभर टक्के अनुदान जाहीर करत नाही. तोपर्यंत माघार घ्यायची नाही’ असा ठाम निर्धार करत विना अनुदानित शिक्षक पांडुरंग टकले,सुभाष मोरे,विजय कवर,सुभाष पाटील,ज्ञानदेव शेळके या शिक्षकांनी मंगळवार दिनांक २० रोजी आझाद मैदानावर मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी आणखी २० शिक्षक केशमुंडन करणार होते. परंतु आझाद मैदान पोलिसांनी हस्तक्षेप करून उर्वरित केशमुंडन आंदोलन रोखले.आता तरी शासन शिक्षकांच्या मुंडन आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य करेल असा विश्वास या विनाअनुदानित शिक्षकांनी व्यक्त केला.
राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून या पावसाळी अधिवेशनामध्ये विनाअनुदानित शिक्षकांनी अनुदान मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून शिक्षक बंधु-भगिणी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात शिक्षक आंदोलनासाठी उपस्थित झाले आहेत.आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी सर्व शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्या अशी मागणी केली. परंतु हे सरकार अनुदाना संदर्भात नेहमीच टाळाटाळ करत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोयीप्रमाणे अनुदान देण्यासंदर्भात चालढकल करण्याचे धोरण अवलंबिले.बघता बघता 2018 हे साल संपत आले.या सरकारचा अवघा १वर्षाचा कालावधी राहिला आहे.आता तरी या सरकारने आपला शब्द पाळावा. अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदानचा टप्पा द्यावा.त्याचबरोबर ज्या शाळांना अनुदान पात्र घोषित केले अशा शाळा नाही अद्याप अनुदान सुरू केले नाही.त्यांना अनुदान सुरू करावे. मूल्यांकनात पात्र होऊन काही शाळा अजूनही अनुदानास घोषित झाल्या नाहीत त्या घोषीत करुन अनुदान सुरू करावे. या सर्व शाळेतील काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी मागील आठवड्यापासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या स्थळी आजच्या क्षणाला राज्यभरातून हजारो शिक्षक या ठिकाणी आंदोलनाच्या स्थळी उपस्थित राहून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन पेटले असून आज विनाअनुदानित शिक्षक
पांडुरंग टकले,सुभाष मोरे,विजय कवर,सुभाष पाटील,ज्ञानदेव शेळके यांनी केशमुंडन केले.या वेळी आणखी २० जण केशमुंडन करणार होते.मात्र आझाद मैदान पोलिसांनी हस्तक्षेप करून उर्वरित केशमुंडन रोखले.

Leave a Reply

Your email address will not be published.