Home » महाराष्ट्र माझा » जन्मोत्सव आणि दर्शन सोहळा..

जन्मोत्सव आणि दर्शन सोहळा..

जन्मोत्सव आणि दर्शन सोहळा..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

श्रीक्षेत्र अश्वलिंग मंदिरात गुरुवारी व शुक्रवारी श्री कार्तिक स्वामी जन्मोत्सव आणि दर्शन सोहळा

पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील श्रीक्ष्रेत्र अश्वलिंग महादेव मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे श्री कार्तिक स्वामी जन्मोत्सव व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि.२२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.५३मि.पासुन दर्शनासाठी प्रारंभ होऊन शुक्रवार दि.२३/११/२०१८ सकाळी ११वा.०८मि.पर्यंत त्रिपुराची पौर्णिमा व कृतिका नक्षत्राचे मुहूर्तावर दर्शनाचा विशेष योग आहे. तसेच दर्शन कृतिका नक्षत्र सायंकाळी ४.४१.मनिटापर्यंत संपेपर्यंत घेण्यास हरकत नाही. तरी पंचक्रोशीतील वारकरी भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे अवाहन संस्थानचे मठाधिपती महंत महादेवानंद भारती महाराज यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील आद्य पुरातन प्राचीन देवालय आहे. मराठवाड्यात एकमेव कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. कार्तिक स्वामी म्हणजे देव सेनापती सर्व ग्रंथामध्ये ज्यांचे वर्णन आलेले आहे. विषेश स्वामींचे जन्मदिनीच फक्त कार्तिक स्वामींचे दर्शन स्रियांसाठी फलदायी सांगितले आहे. जन्मदिनी स्रियांनी दर्शन घेण्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य , पती-पत्नीस आरोग्य, परस्पर प्रित,यशप्राप्ती, संसारी सौख्य आदी मंगलमय जीवनप्राप्त होते व धनधान्य प्राप्तीसाठी दर्शन सोहळा उत्तम मानला जातो.येथे या दिवशी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहुन लोक मोठया संख्येने दर्शनासाठी येतात.

Leave a Reply

Your email address will not be published.