Home » माझा बीड जिल्हा » श्रीसंत स्वामींचा कार्यक्रम सुरु.

श्रीसंत स्वामींचा कार्यक्रम सुरु.

श्रीसंत स्वामींचा कार्यक्रम सुरु.

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

बीड येथील श्रीसंत जनी जनार्धन स्वामींच्या 417 व्या संजीवन समाधी वार्षिक अखंड सेवा प्रबोधोत्सवास वे.शा.स. धुंडीराज महाराज पाटांगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी खिचडी वाटप, माधुकरीपासून प्रारंभ झाला तर उत्सवात वेदमुर्ती यज्ञेश्‍वरशास्त्री सेलूकर यांची सपत्नीक उपस्थिती लाभली. रविवार दि.18 रोजी श्री माऊली पारायण सेवा समितीच्या वतीने श्री ज्ञानेश्‍वरी अखंड पारायण सेवा अर्पण करण्यात आली तसेच सोहळ्यादरम्यान तुकाराम गाथा, गुरूचरित्र, दासबोध, गजानन विजय या ग्रंथाचे अखंड पारायण संपन्न होत असून उत्सवात भाविकांची उपस्थिती वाढत आहे. सोमवार दि.19 रोजी प्रबोधीनी एकादशीनिमित्त आदिशक्ती गुरूप्रसाद भजनी मंडळाच्या वतीने सुश्राव्य भजन संपन्न झाले यावेळी विविध भक्तीगिते सादर झाली तर गुरूवार दि.22 रोजी रात्री ठिक 8.00 नादब्रह्म गुरूवार भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन संपन्न होणार असून शनिवार दि.24 रोजी सकाळी ठिक 10.00 ते 12.00 दरम्यान परमहंस परीवाजकाचार्य व्दाराचार्य ह.भ.प.श्री.अमृतदास महाराज यांची काल्याच्या किर्तन सेवा संपन्न होणार आहे तसेच दुपारी 1.00 ते 6.00 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा उत्सवादरम्यान काकडा आरती, वेद पारायय तर स्वामींचा अभिषेक नियमीत संपन्न होत असून अखंड सेवा प्रबोधोत्सवातील कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पांटागणकर , माळेवाडीकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवार दि.25 रोजी सकाळी ठिक 6.00 वाजता मठाधिपती ह.भ.प. श्री धुंडीराज महाराज पांटागणकर यांचे लळीताचे किर्तन सेवा संपन्न होणार आहे. महिला, पुरूष भाविकभक्तांनी उत्सवातील कार्यक्रमासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त पंाटागणकर, माळेवाडीकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.