प्रा.खंडागळे यांची महाराष्ट्ररत्न पुरस्कारासाठी निवड
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे बीड जिल्हाकार्याध्यक्ष पाटोदा येथील प्रा.सोमीनाथ खंडागळे यांना नुकताच *महाराष्ट्ररत्न* पुरस्कार जाहीर करण्यात आला.
ओबीसी फाउंडेशन ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संघटना आहे.
या संघटनेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्ररत्न पुरस्कारांची नुकतीच घोषणा ओबीसीचे नेते,संघटनेचे राष्टीय अध्यक्ष संजयजी कोकरे यांनी केली.
यामध्ये पाटोदा येथील प्रा.सोमीनाथ खंडागळे यांस व इतर 30 महाराष्ट्रातील रत्नांचा ओबीसी जनगणना समिती
आणि ओबीसी फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्र रत्न प्रदान करुन
12 डिसेंबरला मुंबई मराठी पत्रकार संघ येथे सन्मान
करण्यात येणार आहे असे यावेळी संजय धाकु कोकरे (अध्यक्ष
ओबीसी जनगणना समिती, ओबीसी फाऊंडेशन) यांनी सांगितले.
प्रा.खंडागळे जिल्हाकार्याध्यक्ष-महाराष्ट्र नाभिक महामंडळ बीड या पदावर कार्यरत असून तसेच दैनिक कार्यारंभ चे पत्रकार म्हणून काम पाहतात.
सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले आहे.
ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी अनेक संपात/आंदोलनात सहभाग,आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे प्रतिवर्षी आयोजन, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे प्रतिवर्षी आयोजन,ओबीसी समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत, वर्तमानपत्राच्या माध्यमातून सामाजिक लेखन, नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील, बारा बलुतेदार संघटना चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.
या कार्याची दखल घेऊन त्यांना नुकताच *महाराष्ट्ररत्न* पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या निवडीमुळे प्रा खंडागळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे