Home » माझी वडवणी » पंकजाताई ‘त्या’ शिक्षकांच्या पाठीशी.!

पंकजाताई ‘त्या’ शिक्षकांच्या पाठीशी.!

पंकजाताई ‘त्या’ शिक्षकांच्या पाठीशी.!

डोंगरचा राजा / ऑनलाईन

*शिक्षकांवर अन्याय होवू देणार नाही.-जि.प.अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार*

बीड जिल्ह्यातील 279 शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदोष बिंदूनामावलीचा आधार घेत कार्यमुक्त केले होते.या शिक्षकांनी आज बीड जि.प.
कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनास बीड जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार यांनी भेट देऊन आंदोलकांना दिलासा दिला.ना.पंकजाताई,
खा.प्रितमताई आणि मी स्वत: आपल्यासोबत असून आपल्यावर अन्याय होवू देणार नसल्याचा विश्वास आंदोलक शिक्षकांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले गेले.

ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथजी मुंडे यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातल्याने व जि.प.अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार यांनी स-हदयतेने आंदोलकांना भेटून दिलासा दिल्याने शिक्षकांकडून त्यांचे आभार व्यक्त होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published.