Home » माझा बीड जिल्हा » मेडिकल कडून ग्राहकांची लूट.

मेडिकल कडून ग्राहकांची लूट.

मेडिकल कडून ग्राहकांची लूट.

रविकांत उघडे /डोंगरचा राजा ऑनलाईन..

— औषधाचे वाजवी दर लावून शहरातील एका मेडिकल कडून ग्राहकांची लूट.

— लायन्स रद्द करण्याची मागणी.

माजलगाव दि 17 शहरातील एका मेडिकल कडून औषधाचे अवाजवी बिल लावून ग्राहकाची लूट करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे

गोदावरी पलीकडील मजरथ येथील तानाजी गिरगुणे यांच्या बैलाला सर्प दंश झाला होता.लेकरा पलीकडे सांभाळलेल्या बैल बरा होवा या करिता पशु वैदकीय यांच्या सल्ल्यानुसार या मेडिकल वरून सर्व औषधे खरेदी करण्यात आली होती .मात्र ज्यावेळेस एवठे बिल कसे झाले असे विचारण्या करता ग्राहक मेडिकल वर आले तेव्हा सर्व प्रकार बाहेर निघाला.
बाहेर जिह्यातील ग्राहक पाहून या मेडिकल वाल्यानी त्यांना धमक्या ही दिल्या. मात्र सत्य परेशान होते पराजित होत नाही, या उक्तीप्रमाणे ग्राहकांनी माझ्या जनावरांची भरपाई खर्च द्या अशी मागणी केली आणि मेडिकल वाल्यानी ती चूक मान्य केली आणि भरपाई जागेवर देण्यात आली.या मेडिकल वाल्यांचा संपर्कात अनेक बोगस पशुवैद्यकीय लोक पाळले आहेत. हा घडलेला प्रकार देखील बोगस पशु वैदकीय लोकमुळेच घडल्याचे सांगितले जात आहे.
मेडिकलवाल्यानी अनेक शेतकऱ्यांना फसवल्याचे कळते. या दुकानात तारीख संपलेले औषधे देखील उपलब्ध असल्याचे कळते हे औषधे अवाजवी दर लावून मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळले जात आहे अशा औषधाची विक्री करणाऱ्या मेडिकलवाल्याने शिक्षण कोणत्या वैदकीय विद्यालयात घेतले कधी घेतले आणि कसे घेतले याची सविस्तर चौकशी होऊन परवाना रद्द करून योग्य ते कारवाई हॊवी अशी मागणी सर्वसामान्य ग्राहका कडून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.