Home » माझा बीड जिल्हा » जिवंत नवजात बालक नालीत फेकले..

जिवंत नवजात बालक नालीत फेकले..

जिवंत नवजात बालक नालीत फेकले..
रविकांत उघडे/ डोंगरचा राजा आँनलाईन
पात्रुडमध्ये नालीत  जिवंत नवजात बालक फेकून दिलेले आढळले  ; माजलगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु.
माजलगाव दि.18 (प्रतिनिधी ) :तालुक्यातील  पात्रुड येथे दि.17 वार शनिवारी रोजी  रात्री 10.30 वाजण्याच्या दरम्यान एका नालीमध्ये  पुरूष जातीचे नवजात बालक आढळले. गावातील रहिवासी  लोकांनी  पोलिसांना माहिती देऊन माजलगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, नवजात  अर्भकाची प्रकृती उत्तम  असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
काल रात्री 10.30  वाजण्याच्या दरम्यान नुराणी चौकासमोरील खालचा प्लॉट येथील नालीमध्ये  लहान लेकराचा रडण्याचा आवाज  स्थानिक नागरिकाला ऐकु आला. तिथे पहिले असता नवजात बालक  दिसून आले.
पात्रुड गावातील शेख तौफीक, जफर कुरेशी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची सर्व माहिती दिली. त्यानंतर त्या नवजात बालकास  तात्काळ माजलगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथिल वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी तपासणी करून नवजात बालकाचे वजन 3 किलो असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. तसेच त्याची  नाळ तोडलेली नसल्याने ते एक दिवसाचेच असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एस.डी.नरके, पो.ना.राजेंद्र ससाणे, बापु मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पात्रुड येथे पुरूष जातीचे अर्भक सापडल्याची माहिती स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांना कळाली. यावर त्यांनी रूग्णालय गाठत अर्भकाची पालकत्व स्विकारण्याची भावना पोलिस निरीक्षक मिर्झा वाहब बेग यांच्याकडे व्यक्त केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात अनेक महिलानी पुढे होऊन बालकाचा सांभाळ करत आहेत.दरम्यान,  चाईल्ड लाईन या संस्थेच्या अधिकार्याने पाहणी करून नवजात बालकाची माहिती घेतली. या प्रकरणी शेख तौफिक शेख शब्बीर वय.30 रा.साठे नगर पात्रुड ता.माजलगाव जी.बीड यांच्या फिर्यादीवरूनअज्ञात सज्ञान महिलेने नवजात बालकास संपूर्णतः परित्याग करण्याच्या उदेशाने पात्रुड येथील नुरानी चौकासमोरील खालचा प्लॉट येथील नालीमध्ये फेकून दिले.म्हणून
माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 317 भादवी नुसार अज्ञात महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.