माजी आ.लक्ष्मण जाधव यांचे निधन
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन
— उद्या अंत्यसंस्कार
आष्टी -पाटोदा- शिरूर मतदार संघाचे माजी आ.लक्ष्मण (तात्या ) जाधव यांचे आज पाटोदा येथील निवासस्थानी सांयकाळी 7.00 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले, उद्या दि.17 नोव्हेंबर सकाळी 10.00 वाजता पाटोदा येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहे.तात्याच्या रूपाने पाटो द्याला आमदारकीची माळ मिळाली होती .पाटोदा तालुक्यातील राजकारणाचे भीष्माचार्य म्हणुन तात्यांची ओळख होती ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याशी त्यांचा कायम स्नेह होता त्यांचाच सोबत राहुन त्यांनी आपले राजकारण केले पवार साहेब बीडला आले की तात्या आणी पवार साहेब यांची भेट हमखास ठरलेलीच असायची .जाधव कुटुंबियांच्या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे.