भ्रष्टाचार्यांचा डाव हाणून पाडणार- अमर
डोंगरचा राजा / ऑनलाईन..
— शहर विकासाचा आव आणणाऱ्या लोकांकडून बीड शहरात राबवण्यात येणारी भुयारी गटार योजना वेठीस.- नगरसेवक अमर नाईकवाडे
— उद्घाटन व चिरीमिरीसाठी भुयारी गटार योजनेच्या गुत्तेदारास वेठीस धरण्याचा भ्रष्टाचार्यांचा डाव हाणून पाडणार- अमर नाईकवाडे
— 15 दिवसात भुयारी गटार योजनेचे काम चालू न केल्यास युवा नेते संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला बसणार.
बीड प्रतिनिधी- बीड नगरपरिषदेचे *नगरसेवक अमर नाईकवाडे, भैय्यासाहेब मोरे, प्रभाकर पोपळे, बिभीषण लांडगे, रणजीत बनसोडे* आदी सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,
बीड शहरासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, भुयारी गटार व हरित क्षेत्र विकास (उद्याने) या योजना मंजूर आहेत. *या तिन्ही योजना वेगवेगळ्या नसून त्या अमृत योजनेचाच भाग आहेत.* सदरील अमृत योजनेचे उद्घाटन बीड शहरातील वेगवेगळ्या भागात किमान 10 वेळेस तरी करण्यात आलेले आहे. तरीसुद्धा या योजना *वेगवेगळ्या असल्याचे भासवून* भुयारी गटार योजनेचे पुन्हा एकदा उद्घाटन करण्याचा घाट सत्ताधारी घालत आहेत व त्यास पालिका प्रशासनाची मूकसंमती आहे. *तब्बल चार महिन्यांपूर्वी म्हणजे दिनांक 19 जुलै 2018* रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. भामरे यांनी सदरील *154 कोटी 94 लक्ष 15 हजार 347 रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश* सदरील काम करणारी एजन्सी मे. इंद्रायणी कन्स्ट्रक्शन-केआयपीएल (जे.व्ही.) यांना दिलेले आहेत.
भुयारी गटार योजनेचे कार्यारंभ आदेश देऊन चार महिने झाले तरीही अद्याप भुयारी गटार योजनेचे काम सुरू झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सदरील काम तात्काळ चालू करण्याकरिता संबंधित एजन्सी मे.इंद्रायणी कन्स्ट्रक्शन-केआयपीएल (जे.व्ही.) कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून *आग्रही* आहे. तसे संबंधित ठेकेदाराने *दिनांक 22 सप्टेंबर 2018 व दिनांक 13 नोव्हेंबर 2018* रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता *श्री भामरे* यांच्यामार्फत मुख्याधिकाऱ्यांना *पाठवलेल्या पत्रांवरून* दिसून येते. *जी खूप गंभीर बाब आहे.* बीड नगर परिषदेच्या *निगरगठ्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांना* वेळोवेळी सदरील योजनेचे काम चालू करण्याची *आठवण* करून देऊनही पालिका शासन व प्रशासन पूर्णपणे उदासीन आहे. भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होऊन सदरील योजना कार्यान्वित झाल्यास अस्वच्छतेमुळे शहरात पसरणाऱ्या साथीच्या आजारावर *(उदा. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होणे आदी.)* पायबंद बसेल याचे जराही भान संबंधितांना राहिलेले नाही, साथ रोगांमुळे मृत्युला बळी पडलेल्या नागरिकांची सर्वस्वी जबाबदारी पालिका शासन व प्रशासनाची आहे, त्यामुळे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत असेही *अमर नाईकवाडे* यांनी म्हटले आहे.
मलशुद्धीकरण केंद्र व वेट वेलच्या जागा तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात द्याव्यात व विहित नमुन्यातील करारनामा (शपथपत्र) तात्काळ करण्यात यावे अशा आशयाचे पत्र कार्यकारी अभियंता श्री. भामरे यांनी बीड नगरपालिकेला दिलेले आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या ध्येयधोरणानुसार अमृत योजनेचे काम समयबद्ध कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे. (कार्यारंभ आदेश मिळालेल्या तारखे पासून 24 महिन्यांच्या आत) त्यामुळे वरील नमूद दोन्ही बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे. या कारणांमुळे योजना पूर्ण होण्यास विलंब झाल्यास याची *सर्वस्वी जबाबदारी बीड नगर परिषदेची राहील* असे कार्यकारी अभियंता श्री. भामरे यांनी बीड नगरपरिषदेला पत्राद्वारे कळवले आहे.
बीड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या योजनेत विनाकारण उद्घाटनाचा घाट घालून जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करून सदरील योजनेचे काम तात्काळ चालू करण्यात यावे व चिरीमिरीसाठी गुत्तेदार वेठीस धरण्याचा भ्रष्टाचारी डाव हणून पाडावा व पुढील पंधरा दिवसात भुयारी गटार योजनेचे काम चालू न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते *संदीप भैय्या क्षीरसागर* यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्यात येईल असा इशाराही शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात *नगरसेवक अमर नाईकवाडे, भैय्यासाहेब मोरे, प्रभाकर पोपळे, बिभीषण लांडगे, रणजीत बनसोडे आदींनी* दिलेला आहे.