Home » महाराष्ट्र माझा » आ.धस यांच्यामुळे सबस्टेशनला मंजुरी..

आ.धस यांच्यामुळे सबस्टेशनला मंजुरी..

आ.धस यांच्यामुळे सबस्टेशनला मंजुरी..

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

— आ.धस यांच्या प्रयत्नामुळे पारगाव घुमरा, दादेगाव सबस्टेशनला मंजुरी- ॲड प्रकाश कवठेकर
— परिसरातील गावांना मिळणार उच्च दाबाने वीज
— आष्टी तालुक्यातील दादेगाव आणि पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा परिसरात अतिशय कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे दोन्ही ठिकाणच्या सबस्टेशनसाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला. आ. धस यांच्या प्रामाणिक प्रयत्नना अखेर यश आले असून पारगाव घुमरा आणि दादेगाव येथे सबस्टेशन मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य ॲड प्रकाश कवठेकर यांनी दिली.
रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणारा नेता अशी आमदार सुरेश धस यांची ओळख आहे. राज्यमंत्री असताना सुरेश धस यांनी 20 ऑगस्ट 2014 साली प्रयत्न करून दादेगाव येथे सबस्टेशन मंजूर करून आणले. यावेळी त्यांनी या सबस्टेशनचे भूमिपूजनही केले होते. दरम्यानच्या काळात धस यांचा पराभव झाला आणि दादेगाव येथे सबस्टेशन होऊ शकले नाही. कोणी प्रयत्नही केले नाहीत. तेंव्हापासून या सबस्टेशनचे काम रखडले होते. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून धस सभागृहात गेले. आमदार बनल्यानंतर पहिल्या दिवसापासून ग्राम विकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून सबस्टेशनसाठी त्यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे प्रयत्न केले. आ. धस यांचे सततचे प्रयत्न आणि पाठपुरावयमुळे पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा आणि आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे सबस्टेशन मंजूर झाले आहे. या सबस्टेशनमुळे परिसरातील गावांमध्ये पूर्ण दाबाने वीज पुरवठा होणार आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न आ.सुरेश धस यांनी मार्गी लावला असून शेतकऱ्यांरी सुरेशआण्णा धस यांचे आभार मानत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य ॲड प्रकाश कवठेकर यांनी म्हटले आहे.
चौकट….
*या गावांचा होणार फायदा*
दादेगाव येथील सबस्टेशनमुळे डोंगरगण, पिंपरी आणि परिसरातील गावांना फायदा होणार आहे. तसेच पारगाव घुमरा येथील सबस्टेशनमुळे अनपटवाडी, ढाळेवाडी, नपरवाडी, पारगाव घुमरा, येवलवाडी या गावांचा वीज प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. नवीन सबस्टेशनमुळे पाटोदा शहरावरचा लोड कमी होऊन शहरात उच्च दाबाने वीज पुरवठा होणार असल्याची माहिती जी. प. सदस्य प्रकाश कवठेकर यांनी दिली.
—-

Leave a Reply

Your email address will not be published.