Home » माझी वडवणी » सोळंकेंच्या दौ-यात सहभागी व्हा – चिंचकर

सोळंकेंच्या दौ-यात सहभागी व्हा – चिंचकर

सोळंकेंच्या दौ-यात सहभागी व्हा – चिंचकर

डोंगरचा राजा / ऑनलाईन ..

माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके हे माजलगाव विधानसभा मतदारसंघातील माजलगाव,धारुर, वडवणी या तालुक्यातील गावांचा पाणीटंचाई दुष्काळ दौरा करत आहेत
वडवणी तालुक्यातील विविध गावांना ते भेटी देऊन तेथील स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करणार आहेत तरी वडवणी तालुक्यातील सर्वांनी या दौ-यात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष राहुल चिंचकर यांनी केले आहे.

माजलगांव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके यांनी बुधवारी माजलगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्यानंतर दिनांक 23/11/ 2018 पासून दिनांक 26 /11 / 2018 पर्यंत वडवणी तालुक्यातील चिखलबीड, कुंदेवाडी, देठेवाडी ,सव्वाशेवाडी ,पिंपळा,पिंपळटक्का, सोन्नाखोटा ,देवळा बु, सत्येवाडी,दामोदरवाडी,
निर्मळवाडी,खडकी,देवळा,टोकेवाडी, खंडोबाचीवाडी,रूईपिंपळा, कोठरबन, चिंचवण,ढोरवाडी, कान्हापुर, लक्ष्मिपुर,मामला, साळींबा, पिंपरखेड, चिंचोटी ,हरिश्चंद्र पिंपरी ,बाहेगव्हाण,मोरवड, हिवरगव्हाण, परडी, माटेगाव, खापरवाडी, देवगाव, लवुळ क्रमांक 2 ,काडीवडगाव, चिंचवडगाव, देवडी, खळवट लिमगाव, मोरेवाडी, कवडगाव बु ,लोनवळ, उपळी, पुसरा ,पिंपरी ,धानोरा, चिंचाळा ,दुकडेगाव व सर्व तांडे या गावांना भेटी देऊन गावकर्‍यांशी चर्चा करणार आहेत.या दौऱ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष राहुल चिंचकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.