Home » देश-विदेश » सामाजिक प्रबोधन होईल – रामदासी

सामाजिक प्रबोधन होईल – रामदासी

सामाजिक प्रबोधन होईल – रामदासी

डोंगरचा राजा / ऑनलाईन

— किर्तनातुनच सामाजिक प्रबोधन होईल-
*ह.भ.प. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी.*

जगातला कुठलाही धर्म कधी हिंसा, द्वेष, मत्सर, असूया, वैरभाव करायला शिकवत नाही. धर्म तर मानवी जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, समता, बंधुता, एकता या जीवनमूल्यांची शिकवण देतो.
साने गुरुजी म्हणतात, *खरा तो एकची धर्म, जगाला* *प्रेम अर्पावे..* *धर्म गंगाजलासारखा निर्मळ आहे,* *विशुद्ध आहे पण आज धर्माच्या नावावर माणसे* *राक्षसी वृत्तीने वागत आहेत.* समाजात हिंसा खून, बलात्कार, अत्याचार, चालू आहे. माणूस प्रेमाने एकमेकांजवळ येत नाही. स्वार्थपरायण वृत्ती बळावत आहे. याच असुरी वृत्तीमुळे आज मानवता धर्माचाच ह्रास होत आहे. माणूस चालत्या बोलत्या जिवंत माणसावर प्रेम करू शकत नसेल तर मग न दिसणार्‍या देवावर कसा प्रेम करणार…?
धर्म सांगतो, *अमृतस्य पुत्रा:* प्रत्येक जीव हा
त्याच अमृततत्वातून जन्माला आला आहे. असे प्रतिपादन *ह.भ.प. राष्ट्रीय कीर्तनकार*
*भरतबुवा रामदासी* यांनी आमच्या दैनिकाशी बोलताना व्यक्त केले.
ह.भ.प. भरतबुवा रामदासी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आहेत. गेली चाळीस वर्षांत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 11 हजारांहून अधिक कीर्तने केली. त्यांना महाराष्ट्रातील अनेक मान्यवर सामाजिक संस्थांकडून आतापर्यंत
*कीर्तनभूषण, कीर्तनाचार्य, कीर्तन केसरी,*
*समाजभूषण, चंपावतीरत्न, हिंदूधर्मभूषण,*
*सेवागौरव, कीर्तनकलानिधी, कीर्तन भास्कर*
असे *अनेक पुरस्कार* मिळाले आहेत.
*महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक महोत्सवात* *मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात* *आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते* *त्यांना _राष्ट्रीय कीर्तनकार_ ही उपाधी प्रदान* *करण्यात आली. गुजरात राज्याचे तत्कालीन* *मुख्यमंत्री व आताचे प्रधानमंत्री महामहिम*
*नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना *हिंदूधर्मभूषण* *पुरस्कार देण्यात आला. ह.भ.प.भरतबुवा रामदासी* *यांचे कीर्तन क्षेत्रातील कार्य अद्वितीय आहे.*
*त्यांनी नुसते कीर्तनच केले नाही तर, महाराष्ट्र* *शासनाच्या सांस्कृतिक खात्याच्या वतीने*
*कीर्तन प्रशिक्षण शिबीरातून महाराष्ट्रात अनेक* *नवोदित कीर्तनकारांना प्रशिक्षण दिले. आतापर्यंत* *जवळपास पंधरा प्रशिक्षण शिबीराचे संयोजन*
*बुवांनी केले आहे.*
आमच्याशी संवाद करताना ह.भ.प. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी म्हणाले की, वर्तमान काळात जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद खूप बळावत आहे. अध्यात्मिक क्षेत्रात देखील हेच चित्र दिसत आहे. अध्यात्म या शब्दाचा अर्थ स्वत:मध्ये परिवर्तन घडवणे. कीर्तन ऐकण्याच्या आधीचा मी आणि ऐकल्यानंतरचा मी यात जर परिवर्तन घडणार नसेल तर मग मी फक्त मनोरंजन म्हणून ऐकले का..? मनोरंजनासाठी अनेक कला कार्यरत आहेत. संत म्हणतात, *भक्तीज्ञाना विरहित गोष्टी इतरां न कराव्या* असे कीर्तन नक्कीच परिवर्तन घडवून आणते पण आज समाजाची अभिरूची इतकी बदलली आहे की, तत्वज्ञान सांगणार्‍या कीर्तनकाराला बहुतांशी कमी वाव दिला जातो. संत विचाराचा नंदादीप सतत तेवत ठेवण्याची गरज आहे तरच समाजात सदाचाराचे संवर्धन होईल. ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांनी महाराष्ट्रात अनेक महानगरांतून राज्यस्तरीय पातळीवर कीर्तन महोत्सव घेऊन तरूण वर्गात कीर्तनाबद्दल अभिरुची निर्माण केली. आतापर्यंत कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अमरावती, शेवगाव, जालना, बीड, मुंबई, ठाणे, डोंबिवली, यवतमाळ, अंबाजोगाई अशा कितीतरी शहरांतून महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्याबद्दल त्यांचे कांची कामकोटीचे पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांनी महावस्त्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला आहे. कोल्हापूर येथील धर्मपरिषदेत करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी महाराजांच्या हस्ते *धर्माचार्य* पुरस्कार देण्यात आला. धर्मावर भाष्य करतांना हभप भरतबुवा म्हणाले की, धर्माबद्दल निष्ठा निर्माण झाली तरच खरा भारत निर्माण होईल. सत्य, प्रेम, त्याग आणि निष्ठा हे धर्माचे चार पाय आहेत पण आज पहिले तीन पाय तर शिल्लकच नाहीत. चौथा पाय श्रद्धेचा तोही नष्ट करण्याच्या मार्गावर लोक आहेत. आज राजकारणात कोपर्‍या कोपर्‍यावर सभा होतात तशी धर्म जागृती झाली पाहिजे तरच विकृती दूर होईल. ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांनी कीर्तनातून सातत्याने प्रबोधन देखील केले आहे.
1) शेतकरी आत्महत्या
2) पाणी आडवा पाणी जिरवा
3) मुलगी वाचवा मुलगी शिकवा
4) जातीयता विसरा
असे कितीतरी विषय बुवा संत चरित्राचे दाखले देऊन बोलतात. बुवांनी कीर्तने करून सामाजिक बांधिलकीचा वसा निष्ठेने जपला आहे. कारगिल युद्धात शहिद जवानांच्या पंतप्रधान सहाय्यता निधीस आर्थिक मदत केली. अनाथ मुलांना कपडे वाटप केले, तर गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे. किल्लारी भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत केली अशा अनेक सामाजिक बांधीलकीतून भरतबुवा रामदासी यांनी कीर्तन परंपरा जोपासली आहे. त्यांच्या या विविधांगी कार्याचा गौरव केंद्रीय दळणवळण मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी साहेब यांनी नागपूर येथील कीर्तन महोत्सवात केला आहे. कीर्तन हाच त्यांचा ध्यास आणि कीर्तन हाच श्वास बनलेला आहे. ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांच्या राज्यस्तरीय कार्याला सलाम करून इथेच थांबतो.

Leave a Reply

Your email address will not be published.