Home » माझा बीड जिल्हा » शिवसेना घेराव घालणार – नाईकनवरे

शिवसेना घेराव घालणार – नाईकनवरे

शिवसेना घेराव घालणार – नाईकनवरे

डोंगरचा राजा / ऑनलाईन

माजलगांव शहरातील नविन बसस्थानका
समोर असलेल्या स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या शाखेत शेतक-यांच्या पिक कर्जाच्या फाईल करण्यास तीन ते चार महिण्याचा कालावधी लागत असुन शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आलेला असुनही बॅंक कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शेतक-यांच्या पिक कर्जाच्या फाईली तात्काळ करण्यात याव्यात अन्यथा बॅंक व्यवस्थापकास जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवसेना विधानसभा प्रमुख डाॅ. उध्दवराव नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालणार असल्याचा इशारा व्हाईस चेअरमन अर्जुन नाईकनवरे यांनी निवेदनाव्दारे आज दि. 14 बुधवारी दिला आहे.
शासनाच्या वतीने शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे. त्यामुळे इंडिया बॅंकेत नविन पिक कर्ज वाटप सुरू आहे. परंतु शहरातील नविन बसस्थानकासमोर असलेल्या स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या शाखेत पिक कर्ज वाटपास विलंब लागत आहे. याबाबत शाखा व्यवस्थापकाशी विचारणा केली असता कर्मचारी नाहीत, वरून कर्मचारी देत नाहीत, आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधवा असे उडवाउडवीचे उत्तर देउन टाळाटाळ करण्यात येते. बॅंकेत एक पिक कर्जाची फाईल होण्यास दोन ते तीन महिण्याचा कालावधी लागत आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. शेतक-याला आपल्या जनावरांना चारा, पाणी यासह विवीध कामांसाठी पैशाची गरज असतांनाही बॅंक कर्मचा-यांच्या वतीने होत असलेल्या दुर्लक्षामुळे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख डाॅ. उध्दव नाईकनवरे यांच्या शिष्टमंडळाने शाखा व्यवस्थापकास बुधवारी निवेदन दिले. पिककर्जाच्या फाईल करण्यासाठी नविन काउंटर करण्यात यावे व कर्मचारी वाढविण्यात यावेत अन्यथा बॅंक व्यवस्थापकास घेराव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शेतक-यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.