प्रशासनाविरोधात मस्केंचा एल्गार – काळे
डोंगरचा राजा / ऑनलाईन..
शेतकर्यासाठी मस्केंचा प्रशासनाविरोधात एल्गार –
दुष्काळामुळे शेतकरी हवालदील झाला असतांना शासन व प्रशासन बैठकांचा फार्स करत आहे केवळ निवेदन देऊन सरकार जाग येत नसल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी राजेंद्र मस्के मित्र मंडळ आंदोलन छेडत असुन या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन युवा नेते अनिल काळे यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला आहे. शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.सरकारने तातडीने यावर उपाय योजना राबवाव्यात म्हणून राजेंद्र मस्के मित्र मंडळाने आदोलानांच हत्यार उपसल आहे.उद्या पिंपरगव्हाण येथे कोरड्या तलावासाठी, दुष्काळासाठी ,दाहकता दाखवण्यासाठी, शेतकऱ्यांना घेऊन गुरा ढोरांसह धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी उद्या सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र मस्के मित्र मंडळाचे युवा नेते अनिल काळे यांनी केले आहे.