Home » माझा बीड जिल्हा » दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना धावली – मुळुक

दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना धावली – मुळुक

दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना धावली – मुळुक

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

— २०० शेतकऱ्यांच्या कुटुंबाला केले दिवाळी किराण्याचे वाटप

बीड(प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – युवासेनेच्या वतीने आत्महत्या ग्रस्त व दुष्काळग्रस्तांसाठी दिवाळीनिमित्त किराण्याची दिवाळीभेट देण्यात आली आहे. काल दि १४ नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेबांच्या आदेशानुसार बीड जिल्हा नवनियुक्त पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. या कार्यकारिणीचा सत्कार समारंभ व पत्रकारितेतील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार समारंभ जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या हस्ते आयोजित केला होता. २० % राजकारण आणि ८० % समाजकारण या शिवसेनेच्या विचारसरणीला अनुसरुन कार्य बीड शिवसेनेने केलेले असून येन दुष्काळात शिवसेना या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आली असल्याची भावना जनमाणसातून व्यक्त केली जात आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, जालना रोड नजीकच्या सह्याद्री भवन येथे या मदतीच्या महायज्ञाचे व सत्कारसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या मदतीच्या महायज्ञात माजलगाव, केज, परळी, वडवणी, धारूर, अंबाजोगाई या तालुक्यांतील २०० आत्महत्या ग्रस्त व दुष्काळग्रस्त गोरगरीब शेतकऱ्यांना शिवसेनेच्या वतीने किराणा वाटप करण्यात आला. या किराण्यामध्ये दिवाळीसाठी आवश्यक साधनसामग्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – युवासेनेच्या वतीने देण्यात आली आहे. या सर्वसामान्य आत्महत्या ग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसह नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सोबतच स्व. प्रमोद महाजन आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. बाहेगव्हाणकर व गौरव मातृत्वाचा; सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकपत्रकार भागवत तावरे यांचा सन्मान शिवसेनेच्या वतीने कालच्या कार्यक्रमात करण्यात आला. या सत्कार समारंभाप्रसंगी संजय महाद्वार(जिल्हा समन्वयक), रामदास ढगे(जिल्हा संघटक), बाळासाहेब अंबुरे(उपजिल्हाप्रमुख), सुशील पिंगळे (उपजिल्हाप्रमुख धारूर), रामराजे सोळंके (धारूर-वडवणी तालुकाप्रमुख), व्यंकटेश शिंदे (परळी तालुकाप्रमुख), अर्जुन वाघमारे (अंबाजोगाई तालुकाप्रमुख), आप्पासाहेब जाधव (माजलगाव तालुकाप्रमुख), बाळासाहेब कुरुंद (धारूर तालुकाप्रमुख), रत्नाकर शिंदे (केज तालुकाप्रमुख), संदीप माने (वडवणी तालुकाप्रमुख), गजानन मुडेगावकर (अंबाजोगाई शहरप्रमुख), बंडु शिनगारे (धारूर शहरप्रमुख), अनिल बडे (केज शहरप्रमुख), नागेश दिघे (वडवणी शहरप्रमुख), राजा पांडे (परळी संघटक), डॉ. उद्धव नाईकनवरे (माजलगाव संघटक), अशोक आळणे (माजलगाव समन्वयक), बाळासाहेब पवार (केज समन्वयक), धनंजय देशमुख (तालुका संघटक), रमेश चोंडे (जिल्हा संघटक), अशोक गाढवे (जिल्हा संघटक), मच्छिंद्र काळे (जिल्हा सहसंघटक) संतोष काळे (जिल्हा सह संघटक )आदी पदाधिकार्त्यांसह बीड, गेवराई, आष्टी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलीक खांडे , युवा सेना जिल्हाधीकारी सागर बहीर , जयसिंग चुंगडे जिल्हा सचिव, बप्पासाहेब घुगे जिल्हा समन्वयक, भारत जगताप उपजिल्हाप्रमुख, मशरू पठाण जिल्हा सहसचिव, गोरख सिंघण जिल्हा संघटक, रतन गुजर जिल्हा सहसंघटक, विधानसभा प्रमुख नितीन धांडे, विधानसभा संघटक रणजित आखाडे, उपतालुकाप्रमुख सुनील सुरवसे आदींसह महिला आघाडीच्या जिल्हा संघटक चंद्रकला बांगर, ऍड संगीत चव्हाण ,उप जिल्हा संघटक प्रमीला ताई माळी ,उषाताई यादव, फरजाना शेख या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी संपन्न झाला. या सत्कार समारंभाचे आयोजन जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केले होते. . या सत्कार समारंभ व आत्महत्या ग्रस्त व दुष्काळग्रस्तांच्या मदत कार्यक्रमास दुष्काळग्रस्त शेतकरी, नवनियुक्त पदाधिकारी, आजीमाजी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, शिवसैनिकांची उपस्थिती होती….

Leave a Reply

Your email address will not be published.