Home » माझी वडवणी » संजयचा वाढदिवस.. कुटे कुटुंबाला केली आर्थिक मदत.

संजयचा वाढदिवस.. कुटे कुटुंबाला केली आर्थिक मदत.

संजयचा वाढदिवस.. कुटे कुटुंबाला केली आर्थिक मदत.

डोंगरचा राजा / ऑनलाईन..

— वाढदिवसाच्या फाजील खर्चाला फाटा देत मित्रपरिवाराच्या मनाचा मोठेपणा

वाढदिवसानिमित्तच्या अवास्तवातील खर्चाला फाटा देत वडवणी येथील सरपंच, उपसरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रुई या गावचे सरपंच संजय आंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी आदर्श घ्यावा असा अभिनव सामाजिक उपक्रम राबविण्यात आला पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या स्व.प्रदीप कुटे या ऊस तोड मजूर ड्रायव्हरच्या पीडित कुटुंबाची सोनगिरी तालुका भुम जिल्हा उस्मानाबाद ठिकाणी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. व मित्र परिवाराच्या वतीने कुटुंबीयाकडे 51 हजार रुपये मदत सुपूर्द करण्यात आली. दरम्यान या अभिनव उपक्रमामुळे आंधळे व त्यांच्या मित्र परिवाराने समाजासमोर आदर्श मांडला आहे.
याबाबत वृत्तांत असा की सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका साखर कारखान्यात सोनगिरी, मोनगिरी तालुका भुम जिल्हा उस्मानाबाद येथील ऊसतोड मजूर स्व. प्रदीप कुटे वय बावीस वर्षे हे नुकतेच फायनान्स ने घेतलेल्या ट्रॅक्टर मधुन ऊस वाहतूकीचे काम करीत होते. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय व ते चार महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह होऊन त्यांच्या घरी आलेली नववधू हे सर्व कारखान्याला ऊसतोडीचे काम करीत होते. मात्र दिनांक 4 नोव्हेंबर रोजी एका शुल्लक कारणावरून माढा पोलीस प्रशासनाच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रदीप कुटे यांना अमानुषपणे बेदम मारहाण केली. मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्या खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात होऊन दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरी अठराविश्व दारिद्र्य असल्याने त्या कुटुंबीयांना आधाराची गरज आहे. या प्रकरणाची माहिती वर्तमानपत्रे व येथील मीडियाच्या माध्यमातून मिळताच वडवणी येथील संजय भाऊ आंधळे मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा संकल्प करण्यात आला. योगायोगाने काल दिनांक 12 नोव्हेंबर 2018 सोमवार रोजी येथील सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आंधळे यांचा वाढदिवस होता. सध्याची दुष्काळी परिस्थिती कुटे कुटुंबीयांची दुर्दैवी व्यथा जाणून घेत वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत मित्र परिवाराचे सदस्य शिवाजीराव मुंडे ,अमोल आंधळे ,प्रवीण तोषनीवाल , बिभीषण आंधळे,सुग्रीव मुंडे , उध्दव बडे,आबासाहेब आंधळे या सर्वांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील या गावी जाऊन कुटे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. व त्यांच्या कडे रोख 51 हजार रुपये आर्थिक मदत सुपूर्द केली. दरम्यान दिखाऊपणा करून थाटामाटात वाढदिवस करीत हजारोंचा चुराडा कोणालाही करता येतो. परंतु याच फाजील खर्चाला फाटा देत त्याच पैशातून पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीचे औदार्य दाखवत संजय आंधळे व त्यांच्या मित्र परिवाराने समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श मांडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.