Home » माझा बीड जिल्हा » आपुलकीचा जपण्याचे कार्य – आ.क्षीरसागर

आपुलकीचा जपण्याचे कार्य – आ.क्षीरसागर

आपुलकीचा जपण्याचे कार्य – आ.क्षीरसागर

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाईन

*सौर ऊर्जा प्रकल्प व कामधेनू घनजीवामृत गोखुरखात प्रकल्पाचे थाटात उद्घाटन

आज एकत्र कुटुंब पद्धती विस्कळीत झालेच दिसून येत आहे. त्याचाच परिणाम आज आई वडिलांना आश्रमात राहावे लागत असल्याची खंत व्यक्त करत कामधेनू आरोग्यधाम च्या माध्यमातून या वृद्धांना सावली देऊन मायेचा आपुलकीचा ओलावा देण्याचे कार्य श्रीनिवास आणि मंजुषा कुलकर्णी हे करत असल्याचे गौरव उदगार आ.जयदत्त क्षीरसागर काढले.

बीड तालुक्यातील कोळवाडी येथील कामधेनू आरोग्यधाम, गोशाळे च्या 8 वर्धापन दिनानिमित्त आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या स्थानिक विकास निधीतून सौर ऊर्जा प्रकल्प व कामधेनू घनजीवामृत गोखुरखत प्रकल्पाचे उद्घाटन आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज , एस.बी.आय चे क्षेत्रिय प्रबंधक संजय चामणिकर , विलास बडगे यांची.प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस गोपूजन व प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कामधेनूचे संचालक श्रीनिवास व मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलतांना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की.वृद्धांना,गायींना सांभाळण्याचे व्रत कामधेनू परिवाराने घेतले आहे. मी यापूर्वी देखील याठिकाणी संवाद साधण्यासाठी आलो होतो. त्यावेळी मला समाधान लाभले की याची सेवा करण्याचे पुण्याचे काम केले जात आहे. वृद्धाश्रम सुरू होणे ही अडचण आज एकत्र कुटुंब पद्धती ज्या प्रमाणात विस्कळित होत आहे त्या मुळे ही वेळ आली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.परंतु या कामधेनू आश्रमात आसार, निवारा,सहारा या सोबतच आपुलकीचा,मायेचा ओलावा देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने आज हा ओलावा समाजात आटत चालला आहे. आजची तरुण पिढीला सोशल मीडियाचा सल्ला महत्वाचा वाटत आहे.पण अनुभवी आई वडिलांच्या सल्ला नकोसा झाला आहे असेही ते म्हणाले, आज प्रत्येक गोष्टी साठी वीज महत्वाची आहे. राजकीय व्यक्तीला बघण्याचा दृष्टीकोन आज खुप बदलला आहे त्यांची खलनायकाची प्रतिमा झाली आहे.. हे दुर्दैव आहे. आज एका चांगल्या कार्यासाठी निधी देता आला, खारीचा वाटा उचलता आला, योग्य ठिकाणी निधी दिला याचे समाधान आहे. यापुढेही या कार्यासाठी मायेची सावली देण्यासाठी सभागृहा बांधकामास 3 लक्ष रुपये आपण देत असल्याचे आ.जयदत्त क्षीरसागर यांनी जाहीर केले.
या वेळी आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज म्हणाली की नारायणा चे पूर्ण काम स्त्री शक्ती शिवाय होत नाही गाईच्या संबंधाने या आरोग्यधाम मध्ये गाईचे पालन आधार दिला जात असून कामधेनु म्हणजे मन संकल्प होय आश्रम आणि गुरुकुल बांधण्यापेक्षा मंदिरे बांधण्याची गरज असल्याचे अमृत आश्रम स्वामी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन अलोक कुलकर्णी यांनी केले,आभार श्रीनिवास कुलकर्णी यांनी मानले
कार्यक्रमास जगदीश पिंगळे, उदय पाटील, दिनेश लिंबेकर, प्रमोद पुसरेकर, मंगेश निटूरकर,आर.वाय. कुलकर्णी, रामराजे राक्षसभुवनकर. देवदत्त कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, बळवंत क्षीरसागर, दत्ता बारगजे ,संध्या बारगजे, सरपंच केशव घोळवे,पुंडलिक जाधव, भगवानराव घोळवे, वसंतराव गायकवाड,नामदेव गायकवाड सुरेश भानप, प्रकाश कुरूदंकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.